आज हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 78वा वाढदिवस आहे. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला अमिताभ बच्चन यांनी सोडलेल्या फिल्म्समुळे इतर कलाकारांना कसा फायदा झाला आणि ते नंतरच्या काळात कसे गाजले याबाबत सांगणार आहोत.
हिंदी सिनेसृष्टीतला एक काळ असा होता जेव्हा अमिताभ बच्चन हे सर्व भूमिकांचे केंद्रबिंदू ठरले होते. त्यामुळे प्रत्येक सिनेमाचे दिग्दर्शक फिल्ममधील मुख्य रोलसाठी अमिताभ यांची निवड करत असे. मात्र सर्वचजण अमिताभ बच्चन यांना काम देत असल्याने ते देखील व्यस्त झाले होते.
रोज नवनवीन फिल्मसच्या ऑफर्स त्यांना येत होत्या. अनेक दिग्दर्शक बच्चन यांच्या डेट्ससाठी वाट बघत असत. बच्चन यांच्या अति बिझी शेड्युल्डमुळे काही फिल्मस या उशिरा शूट होईचा. कारण त्यावेळी बच्चन यांची दर्शकांमध्ये असलेली लोकप्रियता एवढी होती की बच्चन साहेब फिल्ममध्ये आहेत म्हणजे अॅॅक्शन, फाईटिंग, सळसळत्या रक्ताला अजून गरम करणारे डायलॉगस हमखास असणार. अशा सर्व बाबींमुळे त्यावेळेसच्या तरुण पिढीने बच्चन यांना चांगलेच उचलून धरले होते. त्यामुळे प्रत्येक दिग्दर्शक हे अमिताभ यांनाचं मुख्य सिनेमातला मुख्य रोल देण्यास आग्रही असायचे.
बरेचदा व्यस्त शेड्युल्डमुळे बच्चन हे काही फिल्मस नाकारत होते किंवा काही फिल्मसला ते नाईलाजास्तव नकार देत होते. अनेकदा सिनेमाची कथा, डायलॉगस आवडलेले असायचे मात्र वेळ नसल्याने ती फिल्म करता येत नसायची. तसेच दिग्दर्शकांना देखील थांबण्याची फुरसत नसायची. अशावेळी बच्चन यांनी नाकारलेल्या फिल्मस दिग्दर्शक हे नवीन हिरोला घेऊन किंवा एखाद्या बच्चन समान कलाकाराला घेऊन करत होते. मात्र हेच पर्यायी कलाकार बच्चन यांच्याप्रमाणे गाजू लागले. सिनेमा बच्चन यांच्या विना जोरदार कमाई करत असे.
विनोद खन्ना : ‘कुर्बानी’ फिल्म
विनोद खन्ना हे देखील त्यापैकीच एक . अमिताभ बच्चन यांनी आपल्या कारकीर्दीतला एक असा सिनेमा सोडला ज्यामुळे विनोद खन्ना सुपरस्टार झाले. 1970 – 1980च्या दशकात फिरोज खान यांना ‘कुर्बानी’ हा सिनेमा बनवायचा होता. या सिनेमासाठी त्यांनी प्रथम अमिताभ बच्चन यांचा विचार केला होता. ते बर्याच दिवस तारखांसाठी अमिताभ बच्चन यांच्याशी बोलत राहिले, पण नंतर अमिताभ बच्चन यांनी काहीतरी कारणास्तव नकार दिला.
आपल्याकडे तारखा नसल्यामुळेच फिरोज खानच्या या चित्रपटावर 6 महिन्यांनंतरच काम करण्यास सक्षम असल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले. फिरोज खान यांना इतका वेळ थांबण्याची इच्छा नव्हती आणि त्यानंतर त्यांनी विनोद खन्न यांना कास्ट केले. हा चित्रपट विनोद खन्नाच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट ठरला.
अनिल कपूर : (मिस्टर इंडिया, स्लम डॉग मिलेनियर)
तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण मुलांसाठी बनवण्यात आलेला ‘मिस्टर इंडिया’ या सिनेमातील प्रमुख रोल देखील अमिताभ बच्चन यांना देण्यात आला होता. दिग्दर्शक शेखर कपूरची पहिली निवड अमिताभ बच्चन यांना होती, परंतु अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटामध्ये रस दाखविला नाही. त्यानंतर ही भूमिका अनिल कपूर यांनी केली. आणि फिल्म सुपरडुपर हिट झाली.
तसेच अनिल कपूरची आणखी एक भूमिका अमिताभ बच्चन यांना देण्यात आली. अनिल कपूर यांनी स्लमडॉग मिलियनेअरमध्ये कौन बनेगा करोडपतीची अँकरची भूमिका बजावली, पण सुरुवातीला ही ऑफर अमिताभ बच्चन यांना देण्यात आली होती.
शत्रुघन सिन्हा : (आन-मेन एट वर्क)
मधुर भांडारकर यांच्या ‘आन – मेन अॅट वर्क’ चित्रपटाला अमिताभ बच्चन यांनीही नाकारले. या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हाची भूमिका अमिताभ बच्चन यांना ऑफर करण्यात आली होती, पण अमिताभ बच्चन यांनी ते करण्यास नकार दिला. मात्र या सिनेमातील शत्रुघ्न सिन्हा यांची भूमिकाही चांगलीच गाजली.