बुलेट बाबा एक दिव्यशक्ती ! गावकऱ्यांनी बांधले मोटारसायकलचे मंदिर, रोज होते यथासांग पूजा
बुलेटचे चाहते आपण खूप बघितले असतील पण याच बुलेटला देव मानणारे आणि त्याचे मंदिर स्थापन करून पूजा करणारे कधी पाहिले नसतील. मात्र आपल्या भारतात एक असे गाव आहे जिथे बुलेट बाबा मंदिर असून रोज दिवस रात्र नारळ, फुले, आगरबत्ती, दिवा लावून पूजा केली जाते. हे वाचायला जितके गमतीशीर वाटत आहे, तेवढाच या बुलेट बाबा मंदिराचा इतिहास देखील रंजक आहे.
राजस्थानमधील बंडई येथे एक मंदिर आहे जेथे लोक देवी-देवतांच्या मूर्तींची पूजा करत नाहीत तर त्याऐवजी मोटारसायकलची पूजा करतात. हे मंदिर बुलेट बाबा मंदिर किंवा ओम बन्ना मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर अनन्य आणि संपूर्ण जगातील एकमेव मोटरसायकल मंदिर आहे.
त्यामागे एक रंजक कथा आहे. 23 डिसेंबर 1988 रोजी ओमसिंग राठोड नावाचा एक माणूस आपल्या बुलेट मोटारसायकलवरून आपल्या सासरच्या माणसांसह आपल्या गावी जात होता. वाटेत झाडाला धडकून त्याचा अपघात झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर त्यांची बुलेट मोटरसायकल जवळच्या पोलिस ठाण्यात नेली. पण दुसर्याच दिवशी पोलिस कर्मचा्यांना ती मोटरसायकल स्टेशनमध्ये सापडली नाही. मोटारसायकल स्वतःच अपघाताच्या ठिकाणी गेली होती. त्यानंतर दुचाकी पोलिस स्टेशनमध्ये परत नेण्यात आली. पण दुसर्याही दिवशी दुचाकी अपघाताच्या ठिकाणी पुन्हा पोहोचली. असे तीन-चार वेळा घडले.
पोलिसांनी कोणतरी मस्करी करतोय म्हणून दुचाकीला लोखंडी साखळ्यांनी बांधून ठेवले आणि त्यावर नजर ठेवली. असं म्हणतात की दुसर्याच दिवशी सर्वांच्या उपस्थितीत दुचाकी आपोआप सुरू झाली आणि साखळ्या तोडून अपघाताच्या ठिकाणी पोहोचली.
त्या नंतर या मोटारसायकलला तिथेच स्थापन करण्यात आले. लोकांनी असे मानले होते की, या बाईकमध्ये काही दैवी शक्ती आहे. नंतर येथे एक मंदिरही बांधले गेले आणि लोकांनी या दुचाकीची पूजा करण्यास सुरवात केली. सध्या याला बुलेट बाबा का मंदिर किंवा ओम बन्ना मंदिर असे म्हणतात.
हे ठिकाण पाली जोधपूर राष्ट्रीय राज मार्गावर आहे. येथे ओम बन्ना नावाचा एक थडगे तयार करण्यात आले आहे, अगदी त्याच ठिकाणी त्याचा अपघात झाला होता. येथे रात्रंदिवस ज्योत प्रज्वलित असते. नारळ, फुले, मद्य वगैरे देण्यासाठी येथून दूरदूरहून भाविक येतात. ओमसिंग राठोड हे चोटिला गावच्या ठाकूर जोगसिंग जी यांचे पुत्र होते. राजपुतांमध्ये, तरुणांना प्रेमाने बन्ना म्हटले जाते.
असे म्हटले जाते की जिथे हा अपघात झाला तो परिसर राजस्थानातील एक अपघात क्षेत्र होते, वारंवार तिथे अपघात होत असत. परंतु या घटने नंतर येथे कोणताही अपघात झाला नाही. ओम बन्नाला लोक अजूनही पवित्र आत्मा मानतात आणि त्यांची बुलेट बाबा म्हणून उपासना करतात. लोकांचा असा विश्वास आहे की, तो त्यांच्यामध्ये अजूनही बुलेटच्या रूपात बसला आहे.