जगात अशी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत ज्या ठिकाणची तथ्ये ऐकून आणि वाचून आपल्याला आश्चर्य वाटते. आज आम्ही तुम्हाला अशा गावाबद्दल माहिती सांगणार आहोत ज्या गावात मोठ्या प्रमाणात जुळ्यांचा जन्म होतो. केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात कोडिनी गाव जुळ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. सध्या नवजात मुलापासून 65 वर्षे वयोगटातील जवळजवळ 350 जुळी जोडपे आहेत. जागतिक स्तरावर, प्रत्येक 1000 मुलांमध्ये 4 जुळे मुले जन्माला येतात, आशियात हे सरासरी 4 पेक्षा कमी आहे.
कोडिनीमध्ये प्रत्येक 1000 मुलांमध्ये 45 मुले जन्माला येतात. ही सरासरी संपूर्ण जगात दुसर्या क्रमांकावर आली आहे, परंतु आशियात प्रथम आहे. जगातील प्रथम क्रमांक नायजेरियाचा इग्बो-ओराचा आहे जिथे त्याची सरासरी 145 आहे. सुमारे 2000 लोकसंख्या असलेले कोडिनी गाव हे मुस्लिम बहुल गाव आहे. या गावात घरे, शाळा, बाजारपेठे सर्वत्र एकमेकांचे हमशकल पाहायला मिळतील. 2008 मध्ये या गावात 300 मुले जन्माला आलेली त्यापैकी 15 जुळे मुले होती. आतापर्यंत एका वर्षात जुळ्या मुलांची ही सर्वाधिक संख्या आहे. आता या गावात 2 नंतर 3 मुलेही जन्माला येत आहेत. गेल्या तीन वर्षांत अशी तीन प्रकरणे घडली आहेत.
#जागतिक स्तरावर चर्चा
जुळ्यांच्या या जन्मांमुळे कोडिनी गाव जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाले आहे. जगातील बर्याच मोठ्या मीडिया हाऊसनी या कथेची माहिती घेतली आहे. विदेशातील अनेक शास्त्रज्ञ वेळोवेळी येथे भेट देतात. तसेच याचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारने कृष्णन बिजू या स्थानिक डॉक्टरचीही नेमणूक केलेली आहे.
#सुमारे 70 वर्षांपूर्वी प्रारंभ
या गावात राहणाऱ्या जुळ्या जोडप्यांमधील सर्वात जुना म्हणजे 65 वर्षीय अब्दुल हमीद आणि त्याची जुळी बहीण कुन्ही काडिया. असे मानले जाते की तेव्हापासून या गावात जुळ्या मुलांचा जन्म होऊ लागला. सुरुवातीला काही वर्षांत काही जुळे मुले जन्माला आली, परंतु नंतर ती कमी झाली आणि आता पुन्हा जुळी मुले वेगाने जन्माला येत आहेत. एकूण जुळ्यांपैकी निम्मे जुळे गेल्या 10 वर्षात जन्माला आलेली आहेत.
#येतात अनेक समस्या
एका गावात अनेक जुळे असल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः शाळेत शिक्षकांना मुले ओळखणे कठीण होते. दुसरी सर्वात मोठी समस्या नवीन विवाहित जोडप्यांना आली आहे. ज्यांना काही दिवसांसाठी त्यांचे जीवनसाथी कोण आहे हे समजत नव्हते. आणखी एक विशेष गोष्ट अशी आहे की जर या जुळ्यापैकी एक मुलगा आजारी असेल तर दुसरादेखील आजारी असतो. म्हणून डॉक्टर दोन्ही मुलांना औषधे देतो.
#अद्याप कारण अज्ञात
या ठिकाणी इतक्या जुळ्या मुलांच्या जन्मामागील कारण काय आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. यापूर्वी, डॉक्टरांनी असा युक्तिवाद केला होता की हे सर्व खाण्यापिण्यामुळे होते परंतु या भागातील लोकांचे भोजन केरळमधील इतर भागांसारखेच आहे. म्हणून हा युक्तिवाद नाकारला गेला. या व्यतिरिक्त, डॉक्टरांना अद्याप इतर कोणतेही कारण सापडले नाही.
दरम्यान, कोडिनी हे एकमेव ठिकाण नाही जेथे जुळ्या मुलांचा जन्म होतो. जगात इतरही अनेक जागा आहेत ज्या ठिकाणीही जुळ्या मुलांचा जन्म होतो. इगबोओरा या नायजेरियातील ठिकाणीही अशाच जुळ्या मुलांचा जन्म होतो. यासह हुंग हाइप (व्हिएतनाम), ताइपे (चीन) याठिकाणीही अशा मुलांचा जन्म होतो. तर अमेरिकेत ट्विन्सबर्ग या ठिकाणी जुळ्या लोकांचा फेस्टिवल साजरा केला जातो.