पुन्हा होणार षटकार आणि विकेट्सची बरसात, IPLची धून दुबईत वाजणार

0

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ची सुरुवात 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार असून त्याचा अंतिम सामना 8 नोव्हेंबरला होणार आहे, अशी माहिती आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी शुक्रवारी पीटीआयला दिली.

पुढील आठवड्यात आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होणार असून त्यास अंतिम रूप देण्यात येईल आणि कार्यक्रमास मान्यता देण्यात येईल. ब्रिजेश पटेल म्हणाले की, ‘लवकरच गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होईल, परंतु आम्ही वेळापत्रक ठरविले आहे. याची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होईल आणि अंतिम सामना 8 नोव्हेंबरला होईल. आम्हाला सरकारची मान्यता मिळेल अशी आशा आहे. हा संपूर्ण 51 दिवसांचा सिझन असेल, असेही पटेल म्हणाले.

पटेल म्हणाले, ‘आम्ही एसओपी बनवत आहोत आणि काही दिवसात ते तयार होईल. दर्शकांना परवानगी द्यायची की नाही हे संयुक्त अरब अमिराती (यूएई) सरकारवर अवलंबून असेल. आम्ही यावर निर्णय त्याच्या सरकारकडे सोडला आहे. तरीही सामाजिक अंतर पाळले पाहिजे. आम्ही युएई बोर्डाला अधिकृतपणे पत्र देखील लिहू. ‘

टी20 वर्ल्डकपला स्थगिती तर IPLला हिरवा कंदील

जगभर पसरलेल्या कोरोनामुळे जागतिक क्रिकेटवरही काही बंधनंं आली आहेत . ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळवला जाणारा नियोजित टी20 वर्ल्डकप ICCने स्थगित केला आहे. त्यामुळे BCCIने पुढाकार घेऊन IPL खेळवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

कसे असे IPLचे स्वरूप ?

युएईमध्ये दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, शेख झायेद स्टेडियम (अबू धाबी) आणि शारजाह मैदान अशी तीन मैदाने उपलब्ध आहेत. बीसीसीआय प्रशिक्षण संघांसाठी आयसीसी अकादमीचे मैदान घेईल, अशी माहिती मिळाली आहे. आयसीसी अकादमीकडे दोन पूर्ण-आकाराचे क्रिकेट मैदान, तसेच 38 टर्फ पिच, सहा घरातील खेळपट्ट्या, 5700 चौरस फूट मैदानी वातानुकूलन क्षेत्र असून फिजिओथेरपी आणि वैद्यकीय केंद्रे आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी अजूनही धोका कायम आहे. त्यामुळे दुबईत सर्व खेळाडूंची तपासणी केली जाईल. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सोशल डीस्टंंसिंगचे नियम पाळले जातील. प्रेक्षकांना शक्यतो मैदानात परवानगी नसेल मात्र या बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याची परवानगी UAE सरकार देणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.