#IPL2020 : CSKला अजून एक धक्का, सुरेश रैना IPLमधून बाहेर

0

दुबई : चेन्नई सुपरकींग (CSK) ला एक पाठोपाठ एक दोन मोठे झटके बसले आहेत. चेन्नईचा फायटर बॅॅट्समन सुरेश रैना यंदाच्या IPL सिझनमध्ये खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यात CSKच्या 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याचंही सांगण्यात येत आहे.

CSKने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सुरेश रैना खेळणार नसल्याचं सांगितले आहे. काही वैयक्तिक कारणामुळे सुरेश रैना खेळणार नसल्याचं सांगतील आहे. सुरेश रैना पुन्हा मायदेशी परत असल्याने उर्वरित IPL 2020ला तो मुकणार आहे.

सुरेश रैना हा चेन्नईच्या महत्वाच्या फलंदाजांपैकी एक असल्याने त्याच्या गैरहजेरीत संघाला नक्कीच त्याची उणीव जाणवणार आहे. तसेच सुरेश रैनानेही अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतली असल्याने त्याच्या चाहत्यांसाठी हा सिझन खूपच महत्वाचा मानला जात होता.

सुरेश रैनानंतर चेन्नईच्या संघावर कोरोनाचेही संकट आले आहे. CSK चे 10 सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत यामध्ये एक CSK संघातील खेळाडू तसेच सराव खेम्यातील खेळाडू यांचा समावेश आहे.

कोरोना पॉझिटीव्ह खेळाडूंना आता कमीत कमी दोन आठवडे आराम देण्यात येणार असे संघ व्यवस्थापन यांच्याकडून सांगण्यात आले आणि सराव सेशन सुद्धा आता थांबवण्यात आले.

वेळेप्रमाने CSK संघाचे ट्रेनिंग सेशन शुक्रवार पासून सुरु होणार होते पण आता कोरोना संकटामुळे पुढील कोणतीच माहिती संघ व्यवस्थापनाने अजून दिलेली नाही. मागील IPL मध्ये CSK फायनल मध्ये MI बरोरबर हारला होता त्यामुळे 2020 मधील सुरवातीचा सामना MI VS CSK होणार आहे पण या संकटामुळे संघ कसा उभारणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.