सचिनचा एक-एक रेकॉर्ड मोडीत विराटची मोठी झेप, 12 हजार धावांचा टप्पा पार

0

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठा विक्रम नोंदविला आहे. सचिन तेंडुलकरनंतर 12 हजार धावा करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. एवढेच नव्हे तर सर्वात कमी डावात त्याने 12 हजार धावा केल्या असून सर्वात जलद 12 हजार एकदिवसीय धावा बनवणारा खेळाडू ठरला आहे.

कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 12 व्या षटकात हा विक्रम केला. सीन एबॉटच्या पहिल्याच चेंडूवर त्याने एक धावा काढून एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या 12 हजार धावा पूर्ण केल्या. विराट कोहलीने अवघ्या 242 डावात 12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. हा एक नवीन विश्वविक्रम आहे.

12 हजार धावा पूर्ण करणाऱ्या इतर फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने 300 डावांमध्ये ही कामगिरी केली. तर श्रीलंकेच्या कुमार संगकाराने 336 आणि श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने 379 डावात 12 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

विराट कोहलीने नुकतेच तिन्ही फॉर्मेट्स एकत्र करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 22 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यामुळे विराट कोहली कुमार संगकारा, सनथ जयसूर्या, रिकी पॉन्टिंग आणि माहेला जयवर्धने, सचिन तेंडुलकर या दिग्गज खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.

या विक्रमासह विराट कोहली भारतासाठी सर्वाधिक धाव करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. विराटपेक्षा जास्त धावा या सचिन तेंडुलकरने केलेल्या आहेत. सचिनने 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18,426 धाव केलेल्या आहेत. विराट कोहली ज्या वेगाने धावा बनवत आहे याच वेगाने धावा बनवल्या तर येत्या काही वर्षांत सचिनचे विक्रम नक्कीच मोडेल.

दरम्यान, विराट कोहलीने 2008 मध्ये एकदिवसीय पदार्पण केलेले आहे. तेव्हापासून त्याने शानदार फलंदाजी करत एकदिवसीय सामन्यांमध्ये 43 शतके आणि 59 अर्धशतके लगावलेली आहेत. विराट हा सध्याच्या काळातला सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.