लॅपटॉप खरेदी करताय? मग आधी हे वाचा 

0

आज जवळपास प्रत्येक कार्यालयीन कामाचे संगणकीकरण झाले आहे. त्यामुळे संगणकाशी प्रत्येकाचाच संबंध येतो. तसेच कामानिमित्त बाहेर असतानाही संगणकाची गरज लागतेच. अशा वेळी डेस्कटॉपपेक्षा लॅपटॉप’ अधिक सोयीचा ठरतो.अशा वेळी आपल्या गरजेच्या दृष्टीने योग्य आणि खिशाला परवडेल असा लॅपटॉप घ्यायचा असेल तर लक्षात ठेवायच्या टिप्स.

लॅपटॉप खरेदी करताना अनेक जण गोधळतात. यात अनेकांना फार साधी कामे करायची असतात. गरज नसली तरी उद्या लागेल म्हणून प्रचंड ताकदीचा लॅपटॉप घेतला जातो. वस्तूत: ही ताकद कधीही वापरली जात नाही किंवा फार क्वचित वापरली जाते. अनेकदा दुकानदार तुम्हाला अति ताकदवान लॅपटॉप उद्या लागेल म्हणून विकतो, वस्तूत: तितकी ताकद कधीही लागत नाही, ताकदवान प्रोसेसर हे महाग असतात आणि त्याचे दुकानदाराला अधिक फायदा मिळतो. आज अतिशय मागणी वाढल्याने आणि चीनमधून पुरवठा बराच कमी झाल्याने नवीन आणि जुन्या लॅपटॉपच्या किंमती फार वाढल्या आहेत. आता मार्केट खराब असल्याने पैसे वाचवणे ही गरज झाली आहे.

लॅपटॉप खरेदी करताना-

  • इंटेलचे आय सिरीजच्या जुन्या प्रोसेसरचे लॅपटॉप ही आय सिरीजचे आहेत म्हणून विकले जातात, यातील काही फार जुने असतात.
  • एक उदाहरण म्हणजे थर्ड जनरेशनच्या आय 3 प्रोसेसर हे सन 2012 ला लाँच झाले होते आणि सन 2014 पर्यंत विकले जात होते. फार फार तर सन 2015 पर्यंत – म्हणजे हे 5 वर्षे जुने लॅपटॉप आहेत. 
  • आता नवीन बेसिक प्रोसेसर – जसे की नवीन पेंटियम हे सेकण्ड / थर्ड जनरेशनच्या आय 3/ आणि काही आय 5 पेक्षा पॉवरफुल आहेत आणि जर बेसिक काम असेल तर पुरेसे आहेत.

 बहुसंख्य लोकांची कॉम्प्युटर/ लॅपटॉपवर काय कामे असतात-

  • इंटरनेट ब्राउजिंग – फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही. यात पण मी असे सांगेन की बरेच टॅब उघडून ठेवायची सवय असेल, तर गुगल क्रोम वापरू नका.
  • व्हिडीओ कॉल – झूम वगैरे – यालाही फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही
  • मायक्रोसॉफ्ट ऑफिस, वर्ड, एक्सेल फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही पॉवर पॉइंट वापरायचा थोडी जास्त, पण काम चालून जाते
  • व्हिडिओ बघणे (व्हीलसी वगैरे)
  • गाणी ऐकणे

वरील कामासाठी फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही, बरीच सॉफ्टवेअर पण कमी प्रोसेसिंग पॉवरवर चालतात. अनेक प्रोग्रामिंगच्या युटीलिटीही फार कमी प्रोसेसिंग पॉवरवर सहज चालतात. त्याचबरोबर ऑनलाइन टीव्ही आपणास ब्राऊसर मध्ये बघता येईल

लॅपटॉप विकत घेताना या गोष्टी बघा-

प्रोसेसर/सीपीयू –  कोणत्याही संगणकाचा सीपीयू जितका शक्तिशाली तितकी त्याची कार्यक्षमता अधिक असते. त्यामुळे लॅपटॉपची निवड करतानाही सीपीयू अर्थात प्रोसेसर लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. सध्या इंटेलचे प्रोसेसर बहुतांश लॅपटॉपमध्ये असतात. त्यातही नवीन लॅपटॉपमध्ये इंटेल कोअर आय ३, आय ५ आणि आय ७ या श्रेणीतील सीपीयू अधिक कार्यक्षम मानले जातात. ‘मल्टिटािस्कग’ तसेच ‘मल्टिमीडिया’ कामांसाठी हे सीपीयू असलेले लॅपटॉप चांगला पर्याय ठरू शकतील. मात्र, इंटेलचे सीपीयू असलेले लॅपटॉप तुलनेने महाग आहेत. अशा वेळी एएमडी किंवा अन्य कंपन्यांचे सीपीयूही उपयुक्त ठरू शकतील. मात्र, त्यांच्या कार्यक्षमतेत मर्यादा आहेत. दुसरं म्हणजे, सीपीयूतून उत्सर्जित होणारी उष्णता लॅपटॉपचे तापमान वाढवते व तो गरम होतो. त्यामुळे सीपीयूचा निकष तपासताना याचीदेखील खबरदारी घ्यायला हवी.

  • इंटेलची आय सिरीज चांगली आहे, पण अगदी सगळ्यात बेसिक आय 3 हा प्रोसेसर हा साध्या कामासाठी फार जास्त होतो, त्याचप्रमाणे आता किमतीही वाढल्या आहेत.
  • इंटेलने पेंटियम हे तुलनेने स्वस्त प्रोसेसर काढले आहेत. पेंटिअम मध्ये ही गोल्ड सिल्व्हर आणि क्वाड कोअर आहेत (quad core – 4 cores)
  • एएमडी या कंपनीचे अनेक स्वस्त प्रोसेसर आहेत यात AMD A6 / A8 / A9 / A10 / A12 हे बरेच चांगले आहेत
  • स्वस्त आणि स्लो प्रोसेसर आले होते पण आता ते मला तरी मार्केट मध्ये दिसले नाहीत. खरे तर ते ही चालून जावेत, हे प्रोसेसर म्हणजे
    • Intel Atom
    • Intel Celeron
    • Amd Sempron (mostly discontinued)

स्क्रीन साईज – तुमच्या कामाचे स्वरूप हे ठिकठिकाणी फिरण्याचे असेल आणि प्रत्येक वेळी तुम्हाला लॅपटॉप सोबत ठेवावा लागत असेल तर नवीन लॅपटॉप खरेदी करताना त्याच्या आकाराचा विचार डोक्यात असू द्या. लॅपटॉप घेऊन सतत प्रवास करावा लागत असेल तर तुम्हाला छोटी स्क्रीन असलेला ‘नोटबुक’ सोयीचा ठरेल. साधारण १२.५ इंच ते १३.३ इंच आकाराची स्क्रीन असलेले लॅपटॉप यासाठी योग्य पर्याय आहेत. त्याशिवाय नोटबुकचे वजनही तुलनेने कमी असणे आवश्यक आहे. अशा वेळी ‘अल्ट्राबुक’ या वर्गात मोडणारे लॅपटॉप उत्तम पर्याय ठरू शकतात. हे ‘अल्ट्राबुक’ वजनाने हलके आणि आकाराने पातळ असतात. तसेच त्यांचे वजनही साधारण दीड किलोग्रॅमइतकेच असते.

स्क्रीनचा दर्जा – तुम्ही लॅपटॉप सातत्याने वापरणार असाल तर, त्याची स्क्रीन ही तुमच्या डोळय़ांना त्रास न करणारी असली पाहिजे. अलीकडे अनेक लॅपटॉपना ‘टचस्क्रीन’ पुरवण्यात आलेली असते. ‘टचस्क्रीन’ असलेला डिस्प्ले हा तुलनेने अधिक भडक असतो. अशी स्क्रीन ही डोळय़ांना त्रासदायक असते. तसेच या स्क्रीनवर प्रतिबिंब दिसण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुम्हाला दिवसभरात जास्त वेळ लॅपटॉप वापरावा लागत असेल तर, ‘टचस्क्रीन’ असलेला लॅपटॉप खरेदी करणे टाळा.

दुसरे म्हणजे, लॅपटॉपची निवड करताना स्क्रीनचे रेझोल्युशन नेहमी विचारात घ्या. १९२०७ १०८० पिक्सेल रेझोल्युशन असलेला फुल एचडी असलेला लॅपटॉप तुम्हाला मूव्ही पाहण्यासाठी उपयुक्त ठरतो. तसेच तुम्हाला तुमच्या लॅपटॉपच्या डेस्कटॉपवर जास्तीत जास्त आयकॉनसाठी जागा हवी असेल तर या रेझोल्युशनचा डिस्प्ले उपयुक्त ठरतो.

रॅम – ‘रॅम’ हा सीपीयूइतकाच महत्त्वाचा घटक आहे. ‘रॅम’च्या क्षमतेवर तुमच्या लॅपटॉपचा वेग ठरतो. मात्र, जितके जास्त जीबीचे रॅम असतील तितकी लॅपटॉपची किंमत जास्त असते. त्यामुळे ‘रॅम’ची निवड करताना तुम्हाला तुमच्या कामासाठी किती जीबीच्या रॅम पुरेशा आहेत, याची काळजी घ्या. चार जीबी रॅम असलेले लॅपटॉप सर्वसाधारणपणे सर्व कामे कार्यक्षमतेने करू शकतात. मात्र, तुमचे काम ‘मल्टीमीडिया’शी किंवा ‘ग्राफिक्स’शी संबंधित असेल तर तुम्हाला त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या रॅम असलेला लॅपटॉपच निवडावा लागेल.

  • रॅम हे कमीत कमी 4 जीबी पण शक्यतो 8 जीबी घ्या. 
  • रॅम हे डीडीआर 4 प्रकारचेच घ्या. डीडीआर 3 रॅम जुने तंत्रज्ञान आहे आणि ते स्लो असते.
  • बऱ्याचदा लॅपटॉप मध्ये 4 जीबी रॅम असते, तर अनेक लॅपटॉप मध्ये रॅम वाढवता येते. 
  • फक्त एक रॅमचा स्लॉट खाली आहे आणि किती रॅम वाढवता येईल त्याची चौकशी करा. तो दुकानदार रॅम वाढवून देतोय का ते विचारा.

स्टोअरेज- सध्या १२८ जीबीपासून एक टीबीपर्यंतची स्टोअरेज अर्थात साठवण क्षमता असलेले लॅपटॉप उपलब्ध आहेत. जेवढी अधिक स्टोअरेज तेवढे चांगले. कारण त्यामुळे तुम्हाला भविष्यात लॅपटॉपवरील स्पेसची कमतरता जाणवत नाही. सध्या एसएसडी आणि हार्ड ड्राइव्ह अशा प्रकारात स्टोअरेज पुरवली जाते. ‘एसएसडी’ असलेल्या लॅपटॉपचा वेग जास्त असतो. मात्र, ‘एसएसडी’मध्ये साधारण १२८ जीबी ते २५६ जीबी इतकीच साठवण क्षमता असते. त्यामुळे या लॅपटॉपमध्ये जागेच्या मर्यादा जाणवतात.

  • हार्ड डिस्क शक्यतो एसएसडी प्रकारची घ्या. तिने चांगला स्पीड मिळतो पण जर साधी हार्ड डिस्क असेल तर आपणास सहज एसएसडी हार्ड डिस्क टाकू शकतो. 
  •  साधारण 240 जीबी एसएसडी अडीच तीन हजारात यावी आणि विकत जिकडून घेता तिकडेच आपणास बदलून मिळेल. त्याला बदलण्याचा आणि त्यावर विंडोज परत लोड करण्याचा चार्ज किती ते विचारा. 
  • जुनी हार्ड डिस्क केसिंग मध्ये घालून एक्स्टर्नल हार्ड डिस्क म्हणून वापरता येईल. 

बॅटरी – लॅपटॉपची बॅटरी किती शक्तिमान आहे, यावर तो किती अधिक काळ चालू शकेल, हे ठरते. तुम्हाला चार्जिगशिवाय जास्त काळ लॅपटॉप वापरावा लागत असेल तर जास्त क्षमतेची बॅटरी असलेला लॅपटॉप घेणे उत्तम. पण त्यासोबतच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, लॅपटॉप हाताळण्याच्या छोटय़ा सवयी बदलून आपण त्याची बॅटरीक्षमता वाढवू शकतो. यामध्ये स्क्रीनचा ब्राइटनेस कमी ठेवणे, रेझोल्युशन कमी निवडणे, मूव्ही किंवा ऑनलाइन व्हिडीओ कमी पाहणे या गोष्टी बॅटरी अधिक काळ टिकवू शकतात.

कीबोर्ड – लॅपटॉपचा आकार बदलतो तसे त्याच्या कीबोर्डचा आकारही कमी-जास्त होतो. अशा वेळी बहुतेक कंपन्या ‘न्यूमपॅड’ला तिलांजली देतात तसेच ‘फंक्शन’ बटणेही कमी करतात. तुमचा लॅपटॉपचा वापर हा कमी टायपिंगच्या संदर्भात असेल तर ‘न्यूमपॅड’ नसलेला कीबोर्ड तुम्हाला चालू शकतो. मात्र, टायपिंग हा तुमच्या लॅपटॉप वापराचा महत्त्वाचा पैलू असेल तर मात्र, तुम्हाला पूर्ण आकाराचा कीबोर्ड असलेला लॅपटॉपच घ्यावा लागेल. हे करतानाही कीबोर्ड हाताळून पाहा. त्यावरील अक्षरांच्या बटणांत मोकळी जागा आहे का, ती बटणे सर्वसाधारण मांडणीसारखीच आहेत का, याची खातरजमा करूनच निर्णय घ्या.

बेसिक लॅपटॉप साठी सुचवलेले स्पेसिफिकेशन

  • Processor – Intel Pentium or AMD A4/A6/A8/A9/A10 *
  • Ram – 8GB DDR 4 **
  • Hard Disk – Preferred SSD or 1 TB of hard disk
  • Screen – 15.5 Inch
  • जर कीबोर्डवर नंबर पॅडची सवय असेल, तर नंबर पॅड आहे का ते बघा.

अजून काही सूचना-

  • घाईघाईत लॅपटॉप घेणे टाळा. आपल्या गरजा जाणून मार्केटचा अभ्यास करा, लोकांशी बोला. काही वेळा आपल्यासारखे काम करणाऱ्या लोकांशी बोला.
  • ऑनलाईन घेत असाल, तर 1/2 आठवडे किमती ट्रॅक करून मग निवड करा.
  • मोठ्या ऑनलाईन साईट – मेझॉन / फ्लिपकार्ट / टाटा क्लिक / रिलायन्स तसेच कंपनीच्या अधिकृत साईट्स, क्रोमा, रिलायन्स यासारखी मोठी दुकाने, साधी दुकाने इकडे शोध घ्या.
  • लॅपटॉपला वाढीव वॉरंटी घेता येते. सर्वसाधारणपणे वॉरंटी 1 वर्षे असते, ती पैसे देऊन 2 ते 3 वर्षे काही वेळा 4 वर्षे ही करता येते. याचे ₹ 4 ते 6  हजार अधिक पडतात पण काही वेळा प्रमोशन ऑफरमध्ये ₹ 1 हजार मध्येही मिळते.
  • काही कंपनी विमाही देतात त्याच्या अटी  बघून विचार करा.
  • हल्ली फार कमी लॅपटॉप विंडोज 10 शिवाय मिळतात आणि त्याची किंमत कमी दिसते . जर विंडोज 10 वर काम करायचे असेल, तर  असले लॅपटॉप घेऊ नका कारण बऱ्याचदा ₹ 2 ते 3 हजार फारकत अधिकृत विंडोज 10 मिळते आणि ते इंस्टॉल करायची कटकट नसते.
  • लॅपटॉपसाठी चांगली बॅग / स्लीव्ह, साफ करायला मायक्रो फायबर कपडा, पाहिजे ते स्क्रीन गार्ड या गोष्टी जरूर घ्या.

गरज आणि बजेट

वरील सर्व निकष लॅपटॉपच्या तंत्रज्ञानाशी संबंधित असले तरी त्यांची निवड करताना आपली गरज आणि बजेट या दोन गोष्टींचा विचार करावाच लागतो. बाजारात लॅपटॉप खरेदी करायला गेल्यानंतर आपल्याला आकर्षक आणि अधिक कार्यक्षम लॅपटॉप दिसतील आणि ते खरेदी करण्याचा मोहदेखील होईल. मात्र, ते आपल्या खिशाला परवडणारे आहेत का, याचा विचार सर्वप्रथम केला पाहिजे. दुसरे म्हणजे, आपल्या कामाचे स्वरूप आणि लॅपटॉपचा सर्वाधिक वापर कशासाठी होणार आहे, याचेही भान बाळगले पाहिजे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.