#Gold : काय आहे नेमकं सोन्याचं आणि अंतराळाचं कनेक्शन ? माहित नसेल तर पटकन वाचा
सोनं असे म्हटले की, बरेच विचार आपल्या मनात येतात. नाही म्हटलं तरी आज सोनं आपल्या यशस्वी आयुष्याचं आणि आपल्या लाइफस्टाइलचं भाग आहे. ज्या व्यक्ती जवळ जितकं जास्त सोनं आहे, तो व्यक्ती तितकंच यशस्वी आणि श्रीमंत मानला जातो. मनुष्य सोनं हा धातू बऱ्याच वर्षांपासून वापरत आलेला आहे. सोन्याने आभूषणे बनवतात आणि एकप्रकारे या धातूला देवीदेवतांसोबत जोडलेले आहे. त्यामुळे सोन्याची पूजा देखील केली जाते. सोनं या धातूबद्दल बऱ्याच कथा आपण ऐकल्या असतील. मानव इतिहासात सर्वात जास्त उल्लेख असलेला धातू म्हणजे सोनं हा आहे. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का? सोनं आपल्या पृथ्वीवर कसं आलं? चला तर जाणून घेऊयात उत्तर….
सोनं आपल्या पृथ्वीवर कसं आलं? यासाठी आपल्याला थोडं वर बघावं लागेल. वर म्हणजे अवकाशात डोकावून बघावं लागेल. हो तुम्ही बरोबर विचार करत आहात. सोनं पृथ्वीवर येण्याचं संबंध अंतराळामधून आहे. सोनं हा एक एक्सट्रा-टेरेस्ट्रियल धातू आहे. जो आपल्या पृथ्वीच्या रॉकीक्रस्टमध्ये नाही तर स्पेसमध्ये तयार झालेला धातू आहे. सोन्याची पृथ्वीवर उपस्थिती स्पेसमधील एक्सट्रा-ऑर्डीनरी इव्हेंट ‘सुपरनोवा’ यामुळे आहे.
काय आहे ‘सुपरनोवा’?
तारे एका लाईटेस्ट मटेरीयल हायड्रोजन पासून बनलेले आहेत. सुरुवातीला फक्त हायड्रोजनचे ढग असतात, त्यात हायड्रोजनची मात्रा अधिक असते. हे अनेक मटेरीयल हायड्रोजनचे एक कोअर बनवतात आणि त्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स तयार होतो. त्यानंतर या मटेरीयलमध्ये एक न्यूक्लिअर रिऍक्शन सुरू होते. ही क्रिया एनर्जी रिलीज करते, ज्यामुळे ताऱ्यांना चमक येते. तारे चमकतात. अब्जो वर्षांनंतर न्यूक्लिअर रिऍक्शन हायड्रोजनला हेवीअर मेटल्स जसे की हेलियम, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कन्व्हर्ट करते. यानंतर ही न्यूक्लिअर रिऍक्शन फास्टट्रॅकवर काम करते आणि नवीन एलिमेंट्स बनवत असते जसे की आयर्न आणि निकेल पण एक पॉईंट आल्यानंतर ही न्यूक्लिअर रिऍक्शन एनर्जी रिलिज करणे बंद करते आणि कोअरची बाहेरील पातळी आतमध्ये सेंटरकडे खिचली जाते. त्यांनतर अचानक एनर्जीच्या इंजेक्शनने स्टार एक्सप्लोड होतात. ज्यामुळे सुपरनोवा तयार होते.
सोनं कशापद्धतीने तयार झाले?
सुपरनोवा एक्सप्लोशनचा प्रेशर इतकं जबरदस्त असतो की, सबएटॉमिक प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स मर्ज होऊन न्यूट्रॉन्स तयार होतात. न्यूट्रॉन्सवर एलिमेंट्स चार्ज नसल्यामुळे हे Fe ग्रुपच्या एलिमेंट्सच शिकार बनतात. Fe ग्रुपचे एलिमेंट्स जितके न्यूट्रॉन्स कॅपचर करतात तितकेचं त्या एलिमेंट्सचे वस्तुमान वाढते आणि त्यामुळे हेवीअर एलिमेंट्स तयार होत जातात. जसे की सिल्वर, गोल्ड, निकेल, युरेनियम इ. हे धातू ताऱ्यांच्या वातावरणात तयार होणे शक्य नाही. मात्र आश्चर्यकारक असे आहे की, हायड्रोजनला हेलियममध्ये रूपांतरीत होण्यासाठी अब्जो वर्ष लागले. पण गोल्ड (सोने) सारखे हेवीअर मेटल फक्त काही क्षणात तयार झाले.
सोने पृथ्वीवर कसे आले?
आता हे सर्वांना माहिती आहे की, आपले युनिव्हर्स एक एव्हर एक्सपांडिंग इव्हेंट आहे. जो सातत्याने पसरत चाललेला आहे. सुपरनोवा एक्सप्लोजन नंतर त्याचे शॉक वेव्ह युनिव्हर्समध्ये सर्वत्र पसरतात. यासोबतच हे सर्व एलिमेंट्स देखील या शॉक वेव्हसोबत ट्रॅव्हल करतात. हे सर्व गॅसेस आणि एलिमेंट्स नवीन स्टार्स ( तारे ) आणि प्लॅनेट क्रीएशनमध्ये युझ होतात. पृथ्वीमध्ये सोनं कदाचित अशाप्रकारेच आले असेल आणि ते जिओथर्मल ऍक्टिव्हिटीजमुळे अर्थक्रस्टमधील लावा व्हेन्समध्ये सेटल झाले असल्याचे शास्त्रज्ञ म्हणतात.
कोटी वर्षांनंतर आज आपण या अमूल्य धातूला जमिनीतून काढतो. ही क्रिया करणे खूप महागडे आहे. म्हणूनच सोनं हे एक दुर्लभ आणि महागडा धातू आहे. इतिहासात मानवाने जितकं सोनं शोधून काढलेलं आहे. त्यात फक्त तीन ऑलम्पिक साईझ स्विमिंग पूल भरले जाऊ शकतात. सोन्याचे साठे हे मर्यादित आहेत. कधी न कधी हे साठेसुद्धा संपुष्टात येणार आहेत.
हे पण वाचा
पहिल्या मोबाईलची गोष्ट ! एका कॉमेकमुळे सर्व जग बदललं आणि सर्वांच्या हातात मोबाईल आला
का बरंं फोनवर बोलताना Hello असे म्हणतात ? नाही माहित ना…! तर असा आहे इतिहास…
भारतात तर सोन्याच्या खाणीचं नव्हत्या, मग का म्हणायचे भारताला ‘सोने की चिडीया’? घ्या जाणून