fbpx

Tik-Tokनंतर केंद्र सरकारचा PUBGवर हल्ला, नव्याने काढलेल्या 250 चायनीज अॅॅपच्या यादीत PUBGचे नाव

भारतातील PUBG प्रेमींना निराश करणारी माहिती समोर आली आहे. भारत सरकार PUBG, LUDO World, Aliexpress आणि इतर 274 चायनीज अॅॅप बंद करणार आहे. गेल्या महिन्यातच Tik – Tok सह इतर लोकप्रिय चायनीज अॅॅप भारत सरकारने बंद केले होते. तर आता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सरकारने आणखी 275 अॅॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाने चिनी अ‍ॅप्सची यादी तयार केली आहे, ज्यावर वापरकर्त्याच्या गोपनीयतेचे उल्लंघन करण्यासाठी आणि भारताच्या अखंडतेची आणि सुरक्षिततेसाठी धोका दर्शविण्यावर लक्ष ठेवले जात आहे. येणार्‍या वृत्तानुसार, या अॅप्सना भारतात कधीही बंदी घातली जाऊ शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, काही अॅॅप्स हे वापरकर्त्याची गोपनीयता भंग करणारे आहेत. तर काही अप्सचा डेटा हा शेअर केला जात आहे. त्यामुळे असे अॅॅप्स हे सूचीबद्ध करण्यात आले आहेत. केवळ वापरकर्ताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनच अशा अॅॅप्सवर बंदी घातली जाणार आहे.

दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “यावर एक प्रक्रिया आहे, अशा बंदीच्या आदेशासाठी एक समिती आहे. जर अशी ऑर्डर असेल तर मीटीवाय कार्य करेल. ”

भारतात Tik-Tokचे 20 कोटी युजर्स आहेत तर PUBGचे 17.5 कोटी वापरकर्ते आहेत. खासकरून तरुणांमध्ये या गेमची विशेष क्रेझ आहे.

Tik Tok हे भारतात 66 कोटी वेळा डाउनलोड केले गेले होते आणि तर हे प्रमाण जागतिक डाउनलोडपैकी 30% होते. सध्या PUBGचे 17.5 कोटी वापरकर्ते आहेत तर जागतिक डाउनलोडपैकी भारतात 24% जणांनी डाउनलोड केले आहे.

भारत चीन सीमेवर झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीनंतर भारत सरकारने चीनप्रती कठोर पाऊलं उचलेली आहेत. अनेक चीनी उत्पादनांवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याची सुरवात सरकारने चीनी अॅॅप्सपासून केली आहे.

मात्र आता PUBG वर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. चायनीज टेक कंपनी टेंन्सेंटकडून PUBG हा गेम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या गेमवर बंदी घातली जाऊ शकते असे सांगण्यात येत आहे.

याआधी बंदी घातलेल्या 59 अॅॅप्समध्ये PUBG ला वगळण्यात आले होते. मात्र आता नव्याने सूचीबद्ध केलेल्या 250 अॅॅप्समध्ये PUBGचे नाव आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here