एकदा वाचा ! भारतीय राफेल, चीनी J-20 आणि पाकिस्तानी F-16 कोण आहे जास्त ताकदवान ?

0

भारताच्या वायुदलात आता बहुप्रतिक्षित राफेल हे लढाऊ विमान दाखल होणार आहे. त्यामुळे आता वायू दलाची ताकद नक्कीचं वाढणार आहे. फ्रान्सशी झालेल्या करारानुसार राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी बुधवारी सकाळी भारतात पोहोचेल. सोमवारी फ्रान्सहून निघालेली पाचही विमाने सात तासांच्या प्रवासानंतर UAEमध्ये उतरली तर आज पुन्हा ते उड्डाण करून भारताकडे झेपावणार आहेत. राफेल हे विमान फ्रान्सच्या द सॉल्ट कंपनी निर्मित आहे.

राफेल हे सर्वात ताकदवान लढाऊ विमानांपैकी एक आहे. रिटायर्ड एयर मार्शल रघुनाथ नांबियार यांनी दिलेल्या माहितीनुसार राफेल हे सध्याचे सर्वोत्तम विमान आहे. त्यामुळे राफेल वायू दलात दाखल होणार म्हणजे भारतीय वायुसेनेसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. 18 वर्षांपासून कोणतेही नवीन लढाऊ विमान तयार झालेले नाही.

भारताच्या शत्रू राष्ट्रांकडे म्हणजेच पाकीस्तान आणि चीनकडे राफेलच्या तोडीचे कोणतेही विमान नाही, असे सांगण्यात येत आहे. पाकीस्तानकडे सध्या F16 हे अमेरिकन बनावटीचे लढाऊ विमान आहे तर चीन कडे J – 20 नावाचे विमान आहे. मात्र राफेलच्या तुलनेत ही दोन्ही विमानं कमी क्षमतेची आहेत.

राफेल – F16 – J 20

राफेल हे विमान जास्त क्षमतेचे का आहे, हे आपण आता जाणून घेऊया. राफेलचा कॉमबे्ट रेडीयस 3700 किलोमीटर आहे तर F-16 चा रेडीयस 4200 किलोमीटर आहे. तर राफेलला टक्कर देऊ पाहणाऱ्या J-20चा कॉमबे्ट रेडीयस 3400 किलोमीटर आहे. कॉमबे्ट रेडीयस म्हणजे विमानाची दूरवर जाऊन मारण्याची क्षमता.

राफेलमध्ये तीन प्रकारचे मिसाईल आहेत. हवेतून हवेमध्ये मारणारे मिटीयोर मिसाईल, हवेतून जमिनीवर मारणारे स्कॅॅल्फ मिसाईल आणि तिसर हॅॅमर मिसाईल. राफेलवर बसवण्यात आलेले मिटीयोर मिसाईल हे 150 किलोमीटर पर्यंत मारू शकत. तर स्कैल्फ मिसाईल हे 300 किलोमीटरच्या रेंजपर्यंत हल्ला चढवू शकतंं. हॅॅमर मिसाईल हे कमी अंतरावर प्रभावशाली हल्ला करण्यासाठी बसवण्यात आले आहे. हवेतून जमिनीवर कमी अंतरावरील शत्रूला टार्गेट करण्यासाठी हे मिसाईल चांगलेच कामाला येईल.

तर पाकिस्तानच्या F-16 वर बसवण्यात आलेले मिसाईल हे केवळ 100 किलोमीटरच्या रेडीयसमध्ये हल्ला करू शकतात. तर चीनचे J-20वर बसवण्यात आलेली PL 15 मिसाईल हे 300 किलोमीटर पर्यंतच्या कॉमबेट रेडीयसमध्ये हल्ला चढवू शकतात. तर PL 21 हे मिसाईल 400 किलोमीटर पर्यंत मार देऊ शकतंं.

कमी वेळा जास्त उंचीवर उड्डाण घेण्याची क्षमता राफेलची जास्त आहे. F-16 हे 254 मीटर प्रति सेकंद मध्ये उड्डाण घेते तर राफेल आहे 300 मीटर प्रति सेकंद मध्ये उड्डाण घेण्यास सक्षम आहे. तर दुसरीकडे J-20बाबत बोलायचे झाल्यास हे विमान 304 मीटर प्रति सेकंद मध्ये झेपावते.

1 मिनिटात राफेल 18 हजार मीटर उंचीवर जाऊ शकते. तर F-16 हे 1 मिनिटात 15,240 मीटरवर जाऊ शकते. तर J-20 हे विमान 18240 मीटर उंच जाऊ शकते.

वेग : J 20चा वेग ताशी 2100 किलोमीटर आहे. तर F-16चा वेग ताशी 2414 किलोमीटर आहे. मात्र दोघांना मागे सोडणारे राफेल हे तशी 2450 किलोमीटर वेगाने प्रवास करणारे आहे.

राफेलची व्हिजीबलीटी ही 360 डिग्री आहे. त्यामुळे शत्रूच्या विमानाला दिसताच क्षणी बटण दाबून उडवण्याची क्षमता राफेलमध्ये आहे. हे विमान पाण्यातील बेसवर देखील उतरवले जाऊ शकते. एकावेळी राफेल 26 टन वजन कॅॅरी करू शकतंं.

एकदा यात इंधन भरले की हे विमान जवळपास 10 तास उड्डाण घेऊ शकतंं. राफेलमध्ये लावण्यात आलेली गन ही एकावेळी 2500 फायर करू शकतंं. रडारमध्ये ही राफेल F-16च्या पुढे आहे. 100 किमीच्या परिसरात राफेल एकावेळी 40 टार्गेट करू शकतंं तर F16 हे 84 किमीमध्ये केवळ 40 टार्गेट ओळखू शकतंं.

अशा वैशिष्ट्यांनी भरलेले राफेल विमान हे भारताच्या वायुदलाची ताकद नक्कीचंं वाढणार आहे. तर पाकिस्तान आणि चीनला देखील याचा चांगलाच वचक बसणार आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.