fbpx
5.1 C
London
Tuesday, December 6, 2022

FAU-G गेमच्या ट्रेलरमध्ये सैन्य आणि भारताचा तिरंगा, नोव्हेंबरमध्ये गेम होणार लाँच

भारतात PUBG मोबाइल गेमवर बंदी घातल्यानंतर लगेचचं अक्षय कुमारने FAU-G मोबाइल गेमचे पोस्टर प्रसिद्ध केले होते. आता FAU-Gचा टीझर व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. हा गेम बँगलोर येथील एनकोअर (enCORE) गेमिंग फर्मने विकसित केला आहे.

PUBG हा गेम भारतात खूपच लोकप्रिय होता. मात्र चीनशी झालेल्या सीमावादावरून भारताने चीनी अॅॅप्सवर बंदी घातली. या अॅॅप्स बंदी मध्ये PUBG गेम देखील बंद झाला. PUBGची लोकप्रियता पाहता भारतीय बनावटीचे गेमिंग अॅॅप असावे असा निर्धार एनकोअर (enCORE) गेमिंग फर्मने केला.

आता याच बहुप्रतीक्षित असलेला FAU-G गेमचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये भारतीय सैन्याचे ग्राफिक्स वापरण्यात आले असून भारत-चीन सीमेवरील दोन्ही सैन्यामधील झडप दाखवली आहे. भूतकाळात भारत आणि चिनी सैनिक यांच्या सीमेवरुन भांडण आणि वादविवाद झाला होता, हे या गेमच्या ट्रेलर व्हिडिओमध्येही पाहायला मिळते.

या संपूर्ण ट्रेलरमध्ये बंदुका वापरल्या जात नाहीत आणि केवळ बंदूकीशिवाय एकमेकांशी लढताना दर्शविली जात आहे. हा खेळ FAU-G गेम enCORE आणि अक्षय कुमार यांच्या भागीदारीत लाँच केला जाणार आहे.

हा ट्रेलर व्हिडिओ 1 मिनिटाचा आहे आणि FAU-G च्या गेम प्लेचा फ़र्स्ट लुक आपल्याला पाहायला मिळत आहे. भारत आणि चीनमध्ये सीमा ताणतणाव सुरू आहे आणि या खेळातही गॅलवान व्हॅलीमधील थरारकता अनुभवायला मिळत आहे.

enCORE गेमिंगच्या मते, हा गेम नोव्हेंबरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या ट्रेलरमध्ये सैन्य आणि भारताचा तिरंगा दर्शविला गेला आहे. ट्रेलरमध्ये भारत चीन सीमा आणि दर्शविली आहे.

तथापि, या ट्रेलरमधून खेळाच्या मिशन आणि खेळाच्या पातळीबद्दल काहीही स्पष्टता नाही. कंपनी हा गेम फक्त मोबाईल किंवा संगणकासाठीही आणणार आहे, हे आत्ता तरी स्पष्ट झालेले नाही.

अक्षय कुमारने या FAUG गेमचा ट्रेलर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर प्रसिद्ध केला. त्यात त्याने असे म्हटले आहे की, आज आपण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दसरा साजरा करतो. त्यामुळे FAU-G सेलिब्रेट करण्यासाठी यापेक्षा आणखी कोणता चांगला दिवस असू शकत नाही.

FAU-G चा फ़ुल फ़ॉर्म Fearless and United Guards असा आहे. आता हा गेम सुरू झाल्यावर लोकांना किती आवडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान PUBG मोबाईल गेमही पुन्हा एकदा भारतात पुनरागमन करू शकेल. कारण PUBGची मूळ कंपनी दक्षिण कोरियाची असून आता भारतासाठी त्याच्या मूळ कंपनीने चिनी कंपनीबरोबरची भागीदारी संपुष्टात आणली आहे. तसेच अलीकडेच PUBG कॉर्पोरेशननेही भारतात नोकर भरतीचे संकेत दिले आहेत.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here