#CarBazar : न्यू ह्युंदाई i20मध्ये ‘हे’ आहेत खास फीचर्स, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “कार हो तो ऐसी”
कोरोना काळात सर्वाधिक आर्थिक फटका कोणत्या व्यवसायाला बसला असेल तर तो व्यवसाय आहे वाहन विक्री. वाहन विक्री व्यवसाय हा गेल्या काही वर्षापासूनच डगमगत असताना त्यावर कोरोनाचे संकट येऊन पडले. या संकटातून बाहेर पडण्यासाठीच आता प्रत्येक वाहन निर्मिती कंपनी आपल्या जवळील नवनिर्मित मॉडेल बाजारत आणत आहे आणि त्यावर काही स्कीम देखील लावत आहे. असेच एक नवीन मॉडेल आणि जबरदस्त स्कीम घेऊन हुंदाई कंपनी आपली नवीन i 20 बाजारात लॉन्च करत आहे.
ह्युंदाईच्या आतापर्यंत बाजारात आलेले सर्वच मॉडेल हे लोकप्रिय ठरले. त्यात कारमध्ये i20 ही तर सामन्यांची विशेष लोकप्रिय ठरली. आता याच i20चे नवीन जनरेशन येत्या नोव्हेंबर महिन्यात ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड लॉन्च करत आहे.
# काय आहे Hundai i20ची खासियत ?
ह्युंदाई i 20चे नवीन मॉडेल हे स्पोर्टी असणार आहे. ट्रायल वेळीच अनेकांनी या कारला रस्त्यावर पाहिल्यावर क्लास गाडी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. कंपनीने शेअर केलेल्या फोटोजमध्ये आपण पाहू शकता आतापर्यंत बाजारात आलेल्या जुन्या मॉडेल पेक्षा i 20चे हे मॉडेल भलतेच रेखीव आहे. यामध्ये अनेक बदल करण्यात आले असून ग्राहकांना वेगळे कलर ऑप्शनही देण्यात आले आहेत.
# न्यू i20 स्पेसिफिकेशन
नेक्स्ट जनरेशन न्यू i20 मध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. नवीन डॅशबोर्ड, सेंटर कन्सोल, डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन, नवीन मल्टी-फंक्शनल स्टेयरिंग व्हील, अॅॅपल-कारप्ले, अँड्रॉइड-ऑटो आणि ब्लूलिंक कनेक्टिव्हिटीसह फ्री स्टँडिंग होरिजोंटल ओरिएंटेड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅॅटिक क्लाइमेंट कंट्रोल, क्रूज कंट्रोल, क्रोम एक्सेंट्स, सनरूफ, वायरलेस चार्जर, असे अनेक फिचर या कारमध्ये देण्यात आले आहे.
कंपनीने वापरलेल्या मटरेलची गुणवत्ता सुधारली आहे. ही कार 1.2 लीटर एस्प्राइटेड पेट्रोल आणि 1.0-लीटर थ्री सिलेंडर टर्बो पेट्रोलमध्ये असणार आहे. 1.5-लिटर डिझेल इंजिनसह मॅन्युअल आणि स्वयंचलित ट्रांसमिशन पर्यायांसह ही कार बाजारात येऊ शकते.
इंटिग्रेटेड एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्ससह शार्प प्रोजेक्टर हेडलाइट्स नव्याने डिझाइन केलेल्या फ्रंट बम्परवर दिसतात, ज्यामध्ये ट्रॅंग्युलर ब्लॅक हाऊसिंगच्या बाजूने फॉग लॅॅप्म दिवे जोडले आहेत.
एक मोठी विंडशील्ड, स्पोर्टियर कट आणि क्रीज, प्रोमिनेंट कॅॅरेक्टर लाइन्स, नवीन हुड स्ट्रक्चर आणि नवीन चाके लावण्यात आली आहेत. मागच्या बाजूला , नवीन i20 Z-शेप्ड सिग्नेचर आणि एलईडी टेल लँप्स असणार आहेत.
कोरोना काळात बसलेला आर्थिक फटका भरून काढण्यासाठी ह्युंदाई i 20चे नवीन मॉडेल चांगला फायदा मिळवून देईल असा विश्वास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारत येणारे हे मॉडेल लोकप्रिय ठरणार का हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.