fbpx
1 C
London
Thursday, February 9, 2023

#केरळ_अपघात : …म्हणून टेबल टॉप एयरपोर्टवर विमान लँड करताना वैमानिकांचा लागतो कस

केरळमधील कोझिकोड विमानतळावर झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर टेबल टॉप एयरपोर्ट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या या अपघातात अनेकजण जखमी झाले तर 2 पायलट सहित 16 जण मृत्युमुखी पडले. या झालेल्या भयंकर अपघातानंतर पुन्हा एकदा टेबल टॉप एयरपोर्टच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. कोझिकोड हे देखील टेबल टॉप एयरपोर्ट आहे. टेबल टॉप एअरपोर्ट्स विमानांच्या लँडिंगसाठी अत्यंत धोकादायक मानले जातात. येथे मोठ्या विमानांचे लँडिंग प्रतिबंधित आहे. येथे विमानाचे यशस्वी लँडिंग बहुधा पायलटच्या अनुभवावर आणि समजण्यावर अवलंबून असते.

काय असते टेबल टॉप एयरपोर्ट ?

टेबल टॉप विमानतळ प्रत्यक्षात एका टेकडीवर तयार केलेले असते. या विमानतळांच्या आसपास किंवा धावपट्टीच्या दोन्ही बाजूला दरी असते. टेकडीवर बांधल्यामुळे त्यांची धावपट्टी इतर विमानतळांपेक्षा खूपच लहान असते. टेकडीवर बांधलेल्या या विमानतळाला मर्यादित जागा असते. टेकडी सपाट करून याचे रन वे बनवले जातात. अशा परिस्थितीत येथे मोठी धावपट्टी बांधणेही फार अवघड आहे. टेकडीवर असल्याने या विमानतळांवरील धावपट्टी व सुरक्षितता क्षेत्रही कमी असते. अशा विमानतळांवर रनवेच्या लांबीव्यतिरिक्त त्यांची रुंदीही कमी असते.

कुठे आहेत टेबल टॉप एयरपोर्ट ?

जगात अशी विमानतळ केवळ चारचं देशात आहेत. यामध्ये केरळमधील कॅलीकट आंतरराष्ट्रीय विमानतळ, भारतातील मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मिझोरममधील लेंगपुई विमानतळ आणि सिक्कीममधील पाक्योंग विमानतळ यांचा समावेश आहे. याशिवाय गोवा, पोर्ट ब्लेअर, लेह विमानतळ लँडिंगच्या बाबतीतही धोकादायक मानला जातो. नेपाळचे तालचा विमानतळ, तेन्झिंग विमानतळ, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ, टूमलिंगटन विमानतळ हे टॅबलेटॉप विमानतळ आहेत. नेदरलँड्स मधील कॅरिबियन बेटावरील जुआन्चो विमानतळ हे टॅबलेटॉप विमानतळ आहे. अमेरिकेत, कॅलिफोर्नियामधील कॅटालिना विमानतळ, एरिझोना मधील सेडोना विमानतळ, वेस्ट व्हर्जिनियामधील यिगर विमानतळ अशीच टेबल टॉप विमानतळ आहेत.

लँडिंगमध्ये काय असतात आव्हाने ?

टेबल टॉप एअरपोर्टवर विमाने उतरविणे कठीण असते. येथे धावपट्टी कमी अहे एक मोठे आव्हानचं असते. अशा विमानतळावर वारंवार हवामानातील बदलही समस्या निर्माण करतात. या व्यतिरिक्त, जोरदार वारा देखील पायलटसाठी मोठे आव्हान उभे करते. एवढेच नव्हे तर पावसाळ्यात ही विमानतळ अधिक प्राणघातक ठरतात. ओल्या धावपट्टीमुळे विमान घसरण्याची अधिक भीती आहे. येथे पायलटांना स्पष्टपणे सूचना देण्यात आल्या आहेत की जर ते अंतर खाली स्पर्श करू शकले नाहीत तर विमान परत हवेत घ्या आणि पुन्हा प्रयत्न करा. असे करण्यात अपयशी ठरल्याने विमानाचा अपघात होण्याची शक्यता वाढते. दक्षिण भारतातील अशी विमानतळ दरवर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान अत्यंत धोकादायक बनतात.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here