‘या’ आहेत जगातील टॉप 10 नेव्हीज, त्यांच्या देशांच्या हद्दीत प्रवेश करताना शत्रूला भरते धडकी
सिद्धेश ताकवले – कोणत्याही देशाची सुरक्षा ही जल,वायू, आणि जमीन या तीनही बाजूंनी अतिशय मजबूत असायला हवी . देशाची एक चूक त्या देशाला कमकुवत करून टाकते. प्रत्येक देश आपल्या सुरक्षतेच्या बाबतीत अतिशय जागृत असतो,आणि याचं कारणामुळे जगातील प्रत्येक देश आपल्या नौदलाला अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करत असतो.
एक गोष्ट अशी सुद्धा आहे की समुद्रातून व्यापार ही फार मोठ्या प्रमाणात केला जातो.जर एखाद्या देशाची नौदल व्यवस्था जर कमजोर असेल तर त्याला माघार घ्यावी लागते. ज्या ज्या देशांना समुद्र किनारा लाभला आहे त्यांना नौदल व्यवस्था ही बळकट कारण गरजेचं आहे. तर आज आपण जाणून घेऊयात की जगतील सर्वात जास्त ताकदवान नौदल कोणत्या देशांचे आहेत आणि ते कितव्या क्रमांकावर आहेत.
१०) जगात १० व्या क्रमांकावर येत ते म्हणजे तैवानचे नौदल. तैवान च्या नेव्ही ला रिपब्लिक ऑफ चायना नेव्ही,तैवान असं म्हटलं जातं परंतु तैवानचा आणि चीन चा काही ही एक संबंध नाही हा वेगळा देश आहे. तसेच त्याला ग्रीन वॉटर नेवी सुद्धा म्हटले जाते.तैवान हा छोटा देश असला तरी सुद्धा त्याने आपली नौदल व्यवस्था बळकट करून जगात १० व्या क्रमांकावर आपल स्थान निर्माण केलं आहे. तैवान च्या नौदलात ४८ युद्धनौका आणि ३८,००० सैन्याची ताकद आहे.
९) जगातील सर्वात ताकदवान नौदल सेनेत ९ व्या क्रमांकावर इटली चे नौदल आहे. तसेच याला मरियाना मिलिटरी असं देखील संबोधल जातं. इटलीच्या नौदलामध्ये २ एअरक्राफ्ट क्यारिअर , ३ लँडिंग व्हेसल्स , तसेच ६६ युद्धनौका आहेत तर ३५,२०० एव्हढे सैन्य आहे.
८) त्यानंतर आठव्या क्रमांकावर येतं ते म्हणजे दक्षिण कोरिया नेवी. दक्षिण कोरिया हा देश अतिशय छोटा आहे मात्र नौदलाच्या बाबतीत हा देश मोठा मानला जातो. या देशाच्या नौदलात ७० युद्धनौका आणि ६८,००० सैन्य आहे.
७) जगातील ताकदवान नौदलांच्या यादीत सातव्या क्रमांकावर भारताचा नंबर लागतो. भारतीय नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या तोफा आहेत. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत. त्याच बरोबर आयएनएस विराट आणि आयएनएस विक्रमादित्य हे दोन विमानवाहक भारताकडे आहेत. तसेच भारतीय नौदलात ५५ युद्धनौका आणि ५८,३५० सैन्य आहे.
६) त्यानंतर या ताकदवान नौदलाच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे फ्रान्स चे नौदल. तसेच फ्रान्स ला मोठा इतिहास सुद्धा आहे. फ्रान्सकडे एकूण ७२ युद्धनौका आहेत तर ४४,००० इतके सैन्य आहे.
५) त्यानंतर जगात पाचव्या क्रमांकावर आहे ब्रिटन ची नेवी. तिला रॉयल नेवी असं सुद्धा म्हणतात. ब्रिटन चे नौदल हे ताकदवान आहे. ब्रिटन यावेळी नवी दोन विमानवाहक , एचएमएस क्वीन एलिजाबेथ आणि एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स यांची बांधणी करत आहे.सद्ध्या ब्रिटन जवळ १०० युधनौका आणि ३६,६०० सैन्य आहे.
४) त्यानंतर जगातील ताकदवान नौदलाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर जपान चे नौदल आहे. जपान चे नौदल हे सर्वात ताकदवान आहे.जपांकडे सद्ध्या ११४ युद्धनौका आहेत आणि ४५,८०० इतके सैन्य आहे.
३) त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतं ते म्हणजे चीन चे नौदल. चीन हे जगातील सर्वात ताकदवान नौदलांपैकी एक आहे. चीनकडे सद्ध्या २३६ युद्धनौका आणि २,५०,००० इतके सैन्य आहे.
२) जगातील सर्वात ताकदवान नौदलाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे ते म्हणजे रशियाचे नौदल. रशियामध्ये सर्व बाजूने सैन्याचा विचार केला जातो, तसेच मोठ्याप्रमाणात खर्च देखील केला जातो. रशिया कडे सद्ध्या २०३ युद्धनौका आहेत.
१) जगातील सर्वात ताकदवान नौदलाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिकेचे नौदल. अमेरिका हा सर्वात बलाढ्य देश समजला जातो तसेच अमेरिका हा सगळ्या बाजूने ताकदवान देश आहे. म्हणून अमेरिकेचा नौदलाच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेच्या नौदलात ४८० युद्धनौका व ३,३६,९७८ इतके सैन्य आहे.
आपण जी आत्ता माहिती जाणून घेतली ती जगातील सर्वात ताकदवान नौदल कोणते व ते कोणत्या क्रमांकावर त्यांचे स्थान आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.