कार खरेदी करताना ‘या’ बारीक गोष्टी नीट तपासून घ्या, नाहीतर पैसे देऊन डोकेदुखी विकत घ्याल

0

कोणतीही नवीन आणि महागडी वस्तू विकत घेताना आपण घाई न करता नीट पारखून घेतली पाहिजे कारण उत्साहाच्या भरात आपली फसवणूक होय शकते. आज आम्ही वाहन खरेदी करताना कोणत्या बाबी तपासून आणि पारखून घेईला पाहिजे याबाबत सांगणार आहे.

प्रत्येकाला स्वतःचे वाहन विकत घेण्याची आवड असते. अनेकजण त्यासाठी प्लॅॅनिंग करून पैसे साठवत असतात. मात्र हेच मेहनतीचे पैसे देऊन पदरी फसवणूक आणि निराशा येणार असेल तर ती गोष्ट मनाला खूप लागते. त्यामुळेच आपण वाहन घेताना उत्साहात न येता चौकसपणाने खरेदी केले पाहिजे.

#वाहन खरेदी करताना पुढील गोष्टी पारखून घ्या…

मॉडेल घेताना चालू वर्षाचे घ्या : कधी पण वाहन खरेदी करताना चालू वर्षाचे मॉडेल घ्या. जर तुम्ही 2020मध्ये वाहन खरेदी करू इच्छित असाल तर ते 2020मध्येच कंपनीकडून बनवलेले असले पाहिजे. बरेचदा कंपनी आदल्या वर्षी बनवण्यात आलेले मॉडेल बाजारात विकण्यासाठी आणते.

जर तुम्ही लेटेस्ट बनवलेले मॉडेल घेतले तर त्यात काही बिघाड असेल तर कंपनी गाडी बदलून देते. आणि हा प्रोब्लेम सर्वच मॉडेलमध्ये असेल तर कंपनी सर्व मॉडेल पुन्हा शोरूमला जमा करून घेते आणि दुरुस्ती जरून पुन्हा ग्राहकांना देते.

दरवर्षी कंपनी गेल्या वर्षीच्या मॉडेलमध्ये काय चुका किंवा अडचणी होत्या ते चालू वर्षात दुरुस्त अथवा बदल करत असते. त्यामुळे चालू वर्षाचे मॉडेल आणि डिझाईन हे गेल्या वर्षी सारखे दिसत असले तरी त्यात कंपनीने इंटर्नल बदल केलेले असतात. ग्राहकांच्या तक्रारीची दाखल घेऊनच कंपनी मॅॅन्युफॅॅक्चरिंगमध्ये सुधार करत असते.

जर तुम्ही 2020च्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये गाडी खरेदी करत असाल तर नक्कीच तुम्हाला 2019मध्ये मॅॅन्युफॅॅक्चर केले मॉडेल मिळेल. पण जर तुम्ही नवीन मॅॅन्युफॅॅक्चर केलेले मॉडेल घेऊ इच्छित असाल तर तुम्ही मार्च एप्रिल पर्यंत थांबावे.

#गाडीची डिलेव्हरी घेताना दिवसा घ्या…

बरेचदा आपण सायंकाळी गाडीची डिलेव्हरी घेण्यासाठी जातो. पण शक्य असेल तर तसे करू नका गाडीची डिलेव्हरी सकाळी दिवसा घ्या. रात्रीच्या वेळी शो रूम्समध्ये ब्राईट लाईट असतात. त्यामध्ये आपल्याला गाडीवर जर डेंट किंवा स्क्रॅॅच असेल तर तो दिसत नाही. तसेच गाडीचा रंग देखील लाईट्सच्या ब्राईटनेसमुळे वेगळा दिसतो. गाडी घेताना कधीपण दिवसा घ्या गाडीचा रंग कुठे फिक्का तर नाही ना हे देखील तपासून घ्या…

#गाडीला अॅक्सेसरीज लावताना घाई करू नका…

बरेचदा शोरूम मधून आपल्याला सांगण्यात येते की, तुमच्या गाडीला आधीच अॅक्सेसरीज लावून देऊ का ? कारण जर तुम्ही नंतर अॅक्सेसरीज लावायला सांगाल तर त्याला वेळ जाईल तुम्हाला डिलेव्हरीसाठी थांबावे लागेल, असे आपल्याला सांगण्यात येते. ते त्यांचे काम असते. ते आपल्याला काहीही सांगत असले तरी अॅक्सेसरीज लावण्याची घाई करू नका. कारण बरेचदा गाडीवर काही डाग किंवा स्क्रॅॅच पडलेले असतात. ते झाकण्यासाठी आपल्याला अॅक्सेसरीजचा आग्रह केला जातो. त्यासाठी तुम्ही एक करू शकता. गाडी ज्यावेळी वेअर हाऊसमध्ये येईल तेव्हा तुम्ही ती जाऊन पाहू शकता. गाडीचा रंग, त्यावर काही डेंट, स्क्रॅॅच तर नाही ना ते तपासून घ्या आणि मग तुम्ही अॅक्सेसरीज लावण्याचा निर्णय घेऊ शकता.

#टायर आणि टूल बॉक्स तपासून घ्या…

गाडी घेताना टायर आणि टूल बॉक्स तपासून घेतलं पाहिजे. गाडीचे सर्व पार्ट बदलून मिळतात पण कंपनी टायरची जबाबदारी घेत नाही.एकदा का गाडी तुम्ही शोरूमच्या बाहेर घेऊन गेला की तुम्हाल टायरची शंका वाटली तर कंपनी त्यास जबाबदार नसते. त्यामुळे गाडी ताब्यात घेतनाच टायरची गुणवत्ता तपासून घ्यावी. स्पेअर व्हील देखील तपासून घ्यावे. इलेक्ट्रीकल उपकरण देखील तपासून घ्यावीत.

#गाडीचे किलोमीटर चेक करा….

नवीन गाडी घेतली तरी ती आधी टेस्टसाठी 100 किमी पर्यंत पळवलेली असते. त्यामुळे 100 किमी तिचे रनिंग आधीच झालेले असते. ते साहजिक आहे. त्यात काहीच दोष नाही. पण 125 पेक्षा जास्त किलोमीटर जर गाडीचे रनिंग असेल तर ती घेणे शक्यतो टाळा. त्या बदल्यात दुसरी गाडी घ्या. बरेचदा डेमो कार किंवा ट्रायल कारच विकण्यास ठेवली जाते. त्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते.

वाहन खरेदी करताना अशा अनेक बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही तपासून घ्यायला पाहिजेत. काही गोष्टी तुम्हाला शुल्लक वाटतील पण त्याच नंतर त्रासदायक ठरतात. पैसे देऊन डोकेदुखी विकत घेण्यापेक्षा जर तुम्ही गोष्टी आधीच नीट पडताळून आणि पारखून घेतली तर नंतरचा होणारा त्रास कमी होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.