स्वच्छतेच्या बाबतीत भारतातील हे गाव आहे आशियातील सर्वात स्वच्छ गाव, जाणून घ्या वैशिष्टय

0

स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याकडील खेडी, गावे आणि शहरांची अवस्था अत्यंत बिकट आहे. तसेच दुसरीकडे आशियातील सर्वात स्वच्छ गाव आहे हे भारतात आहे हे एक आश्चर्य आहे. मेघालयातील मावळिनॉंग हे गाव सर्वात स्वच्छ गाव आहे, ज्याला देवाचे उद्यान (God’s Own Garden) देखील म्हटले जाते. स्वच्छतेबरोबरच हे गाव शिक्षणातही अग्रेसर आहे. येथील साक्षरता दर शंभर टक्के आहे, म्हणजेच इथले सर्व लोक सुशिक्षित आहेत. एवढेच नव्हे तर या खेड्यातील खूप लोक फक्त इंग्रजीमध्येच बोलतात.

मेघालयातील खासी हिल्स जिल्ह्यातील हे गाव शिलाँगपासून आणि भारत-बांगलादेश सीमेपासून 90 किमी अंतरावर आहे. 2014 च्या जनगणनेनुसार 95 कुटुंबे येथे राहतात. येथे सुपारी लागवड हे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. येथील लोक बांबूपासून बनविलेल्या डस्टबिनमध्ये कचरा जमा करतात आणि तो एका ठिकाणी गोळा करतात आणि नंतर शेतीसाठी खत म्हणून वापरतात.

गावकरी स्वतः करतात सफाई

हे गाव 2003 मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ आणि 2005 मध्ये आशियातील सर्वात स्वच्छ गाव बनले. या गावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गावकरी येथे सर्व साफसफाई स्वतः करतात. ते सफाई यंत्रणेसाठी कोणत्याही प्रकारे प्रशासनावर अवलंबून नसतात. या संपूर्ण गावात बांबूने बनविलेले डस्टबिन आहेत. कोणताही ग्रामीण, मग ती एक स्त्री असो, पुरुष असो की मूल, जेथे घाण दिसेल तेथे लगेच साफसफाईची सुरूवात करतात, मग ती सकाळची वेळ असेल, दुपारची असेल किंवा संध्याकाळची असेल साफसफाईच्या कामात कुणीही मागे राहत नाही.

रस्त्यावर चालत असताना एखाद्या गावकऱ्याला कचरा दिसला तर तो थांबेल आणि तो उचलून डस्टबिनमध्ये टाकेल आणि मग पुढे जाईल, यावरून आपण तेथे स्वच्छतेविषयी जागरूकता किती आहे याचा अंदाज लावू शकतो. या गावाला ही सवयचं उर्वरित भारतापेक्षा वेगळे बनवते जिथे आपण प्रत्येक गोष्टीसाठी प्रशासनावर अवलंबून असतो पण स्वत: हून काही पुढाकार घेत नाही.

पर्यटकांसाठी आकर्षण

या गावाच्या आजूबाजूला पर्यटकांसाठी अनेक आश्चर्यकारक स्थळे आहेत. ज्यात धबधबा, लिव्हिंग रूट ब्रिज (झाडाच्या मुळांपासून बनलेला पूल) आणि बॅलेंसिंग रॉक यांचा समावेश आहे. याशिवाय आणखी एक अतिशय प्रसिद्ध पर्यटन आकर्षण म्हणजे 80 फूट उंच माथ्यावर बसून शिलांगच्या नैसर्गिक सौंदर्य न्याहाळणे. आपण मावळिनॉंग गावाला भेट देऊन आनंद घेऊ शकता परंतु आपण त्या ठिकाणचे सौंदर्य खराब होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

कसे पोहचाल या गावात ?

मावळिनॉंग गाव शिलाँगपासून 90 किमी आणि चेरापुंजीपासून 92 किमी अंतरावर आहे. दोन्ही ठिकाणांहून आपण रस्त्याने येथे पोहोचू शकता. तसेच आपण देशाच्या कोणत्याही भागातून हवाई मार्गाने शिलॉंगला पोहोचू शकता. पण इथे जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही पोस्टपेड मोबाईल नंबर आपल्या बरोबर घ्यावे कारण ईशान्येकडील बहुतेक राज्यात प्रीपेड मोबाइल बंद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.