उत्तर आर्क्टिकवर तापमान वाढीचे संकट प्राणीमात्रांवर दूरगामी परिणाम

0

जगावर एका बाजूने कोरोनाचे संकट असताना आता उत्तर आर्क्टिक भागात तापमान वाढीचे संकट आले आहे. त्यामुळे नेहमीच कमी वातावरणात वावरणाऱ्या प्राणीमात्रांवर त्याचा दूरगामी परिणाम होत आहेत. नॉर्वेच्या आर्क्टिक द्वीपसमूह स्वालबार्ड येथे शनिवारी सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले आहे, अशी माहिती नॉर्वेच्या हवामान संस्थेने दिली आहे. वैज्ञानिक अभ्यासानुसार, आर्क्टिकमध्ये ग्लोबल वार्मिंगचे परिणाम दुप्पट वेगाने होत आहे.

हवामान तज्ज्ञ क्रिस्टन गिसलेफोस यांनी एएफपीला सांगितले की, सलग दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी द्वीपसमूहात दुपारी 21.2 अंश सेल्सिअस (70.2 फॅरनहाइट) तापमान नोंदविण्यात आले. दुपारनंतर स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6:00 वाजण्याच्या सुमारास तापमान 21.7 अंश सेल्सिअस वर स्थिरावले.

उत्तर नॉर्वे द्वीपसमूहातील स्पिट्झबर्गन हा एकमेव वस्तीतील बेटांवर प्रभुत्व असलेला गट उत्तर ध्रुवापासून 1000 किलोमीटर (620 मैल) वर आहे. स्वाल्बार्ड बेटांवर वर्षाकाठी साधारणत: 5 ते 8 अंश सेल्सिअस तापमान राहील अशी अपेक्षा होती. मात्र अपेक्षे पेक्षा जुलै महिना सर्वाधिक उष्ण महिना ठरला.

जानेवारीपासून या प्रदेशात तापमान पाच अंशांपेक्षा जास्त वाढले असून, आर्क्टिक सर्कलच्या पलीकडे जुलैच्या मध्यात सायबेरियात तापमान 38 अंशांवर जाऊन पोहोचले आहे.

ग्रीनहाऊस वायू उत्सर्जनाच्या वाढत्या पातळीमुळे 2000 ते 2100 या शंभर वर्षाच्या दरम्यान द्वीपसमूहातील सरासरी तापमानात 10 अंशांनी वाढ होईल, असे स्वाल्बार्डच्या हवामानात खात्याच्या अहवालात म्हंंटले आहे. तर तापमान वाढीचे हे परिणाम 1971 ते 2017 दिसून आले आहेत.

दरम्यान स्वालबार्ड हे पांढऱ्या वर्णाच्या अस्वलसाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथील भूमीत अनेक ऊर्जा साधने देखील आहेत. या भागात कोळशाच्या खाणी देखील असल्याने यातूनही काही घटक उत्सर्जित होतात. ज्यामुळे तापमान वाढीस प्रोत्साहन मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.