fbpx
4.6 C
London
Sunday, January 29, 2023

आत्मविश्वास नसणे म्हणजे बिना इंधनाची महागडी गाडी, यशस्वी होण्यासाठी ‘या’ 10 गोष्टींना आयुष्यात प्राधान्य द्या

आयुष्य जगत असताना अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा प्रमाणे आत्मविश्वास देखील एक मूलभूत गरज आहे असे म्हणता येईल. माणसाकडे जर आत्मविश्वास असेल तर पण कोणतेही आव्हानात्मक काम सहज शक्य करू शकतो. आपल्या मराठी भाषेत असे म्हणतात की, आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

आत्मविश्वासा शिवाय माणसाचे आयुष्य हे अपूर्ण आहे. आत्मविश्वास नसणे म्हणजे बिना इंधनाची महागडी गाडी. गाडी कितीही महागडी असली तरी त्यात जर पर्याप्त इंधनच नसेल तर त्याचा उपयोग शून्य असतो. त्याचप्रमाणे तुमच्यात आत्मविश्वास  नसेल तर तुमची दशा देखील महागड्या गाडी प्रमाणेच असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच दहा गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतो.

१.) सकारात्मक विचार करा

आयुष्यात दोन्ही प्रकारच्या  परिस्थिती येतात, कधी दुःखाचे, वाईट प्रसंग आले तर त्यातही चांगलं काहीतरी घडलेलं असतचं.  फक्त तेवढं शोधुन काढायचं.  त्या प्रसंगातुन बोध घ्यायचा, बाकीचं विसरुन, हसत खेळत पुढच्या प्रवासाला निघायचं. सकारात्मक विचार हे आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे कोणतेही संकट आले तरी नकारात्मक विचारांनी मन खट्टू करू नका.

२). स्वतःला ओळखा

मी कसा आहे, मला माहितीये !  कधी कधी आपल्या वस्तुवर किंवा वागण्यावर टिका होते. जवळच्या माणसांचे शब्द जास्त वेदना देतात, टिकेतुन स्वतःमध्ये काय काय सुधारणा करता येईल? फक्त एवढाच विचार करायचा, बाकी विसरुन जायचं, बाकी त्याविषयी जास्त चिंतन, चिंता अणि चर्चा करण्यात वेळ घालवायचा नाही, फार लोड घ्यायचा नाही, सरळ डिलीट मारुन मोकळं व्हायचं.

४). आपल्या कृतीवर लक्ष द्या

नुसतं बोलल्याने काम होत नाही, ती फक्त सुरुवात असते, सळसळत्या उत्साहाने, आणि निधड्या छातीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची. यश मिळेपर्यंत चिकाटीने काम करत रहायचं. लवकरच काम पूर्ण होतं असते. त्या कामातुन मिळालेला विश्वास पुढच्या कामात वापरायचा.

५). चूक झाल्यास घाबरू नका

तुमच्याकडून एखादी चूक झाली असल्यास त्याचा स्वीकरा करा. त्याचबरोबर चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. पण त्यामुळे तुमचा आत्मविश्वास गमावू नका. नवीन किंवा माहित नसलेल्या गोष्टी शिकून घ्या. कामाचे स्वरुप नीट समजल्यावर तुमचा आत्मविश्वास आपसुकच वाढेल.

६). नजरेला नजर देऊन बोला

कवी विं.दा.करंदीकर यांनी म्हटल्याप्रमाणे नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर या उक्तीप्रमाणे समोरच्या व्यक्तीच्या नजरेस नजर मिळवून बोला. यामुळे आपसुकच तुमचा आत्मविश्वास वाढेल.

७). स्वत:साठी वेळ काढा

दिवसभराच्या धावपळीत स्वत:ला काय दिले याचा विचार करा. अर्थात स्वत:ला वेळ द्या. थोड्या वेळासाठी एकांत राहा. स्वत:बद्दल विचार करा. योगा, करा किंवा स्वत:चा छंद जोपासा

८). चांगली संगत निवडा

तुमचा आत्मविश्वास आजूबाजूच्या लोकांवरही अवलंबून असतो. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. जे लोकं तुम्हाला प्रोत्साहित करत असतील व पडत्या काळात तुमची मदत करत असतील असे लोकं योग्य मार्गदर्शन करतात. ती व्यक्ती कुटुंबातील, मित्र किंवा सहकारी असू शकते.

९). आपली स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करत राहा

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी म्हटल्याप्रमाणे स्वप्न ती असतात जी रात्री झोपेत पडतात स्वप्न ती असतात ज्यामुळे आपण झोपू शकत नाही. त्यामुळे आपल्या ध्येयावर प्रेरित होऊन आपली सारी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा त्यातून आत्मविश्वास वाढीसाठी मदत होईल.

१०). आपल्यातील उणिवा शोधून त्यात दूर करण्यासाठी प्रयत्न करा

स्पर्धाही इतरांशी न करता स्वतःशी केल्यास व्यक्ती यशस्वी होते त्यामुळे स्वतःला कमी न लेखता आपल्यातील उणिवा दूर करून स्वतःचे व्यक्तिमत्व हे चांगले घडवा.

  – संकेत देशपांडे 

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here