नक्की वाचा ! 3 हजार किलोमीटरचा प्रवास करून कसे आले भारतात मोमोज, रोचक आहे इतिहास…

0

मोमोज ही भारतातील एक अतिशय लोकप्रिय डिश आहे. शाकाहारी असो किंवा मांसाहारी असो, मोमोजच्या बाबतीत सर्व वयोगटातील लोकांची क्रेझ इथे पाहण्यासारखी आहे. ही एक डिश आहे जी फक्त रस्त्यावरच नाही तर बाजारपेठेत, कार्यालयात आणि मॉल्समध्ये देखील आढळते. स्ट्रीट फूड म्हणून मुलांचे, तरुणांचे आणि ज्येष्ठांचे प्रेम मोमोजबद्दल काही ओरच आहे.

भारतीय लोकांना ठेल्यावरचे पदार्थ खायला म्हणजेच प्रोफेशनल लँग्वेजमध्ये स्ट्रीट फूड खायला खुप आवडतं. म्हणूनच स्कुल असो वा कॉलेज, ऑफिस असो वा मॉल इ. च्या आसपास तुम्हाला मोमोजचा ठेला नक्की दिसेल. उन्हाळा असो वा हिवाळा मोमोज खाण्यासाठी कुठल्याही ऋतूमध्ये लोकांचा उत्साह एकसारखाच असतो. पण तुम्हाला माहीती आहे का की, मोमोजला भारतापर्यंत यायला किती लांब प्रवास करावा लागला? तुमचे आवडते, स्वादिष्ट, आंबटचिंबट मोमोज चक्क 3 हजार किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या आवडत्या पदार्थांत सामील झाले आहेत.

मोमोज ही डिश नक्की आहे कुठली आणि भारतात कशी आली ?

मोमोज ही तिबेटची डिश आहे. ही डिश चीनच्या मालपुए डिशने प्रभावित आहे. मोमोज नेपाळमध्ये प्रसिद्ध होऊन भारतात आले. ईशान्येकडील राज्यांच्या शहरांमध्ये मोमोजने आपला ठसा उमटविला आणि मोमो डिश सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूडच्या यादीत सामील झाली. उत्तराखंड आणि हिमाचल या डोंगराळ राज्यात मोमोजची प्रचंड लोकप्रियता आहे.

असेही म्हटले जाते की, तिबेटच्या आधीही चीनमध्ये मोमोज तयार केले गेले होते. पण तिथे या डिशचे वेगळे स्वरूप होते. मोमोजचा अर्थ म्हणजे वाफेमध्ये शिजवलेले ब्रेड.

Momos

असेही म्हटले जाते की, मोमोज डिश तिबेटच्या लहासामध्ये प्रथम तयार केली गेली होती. यानंतर या डिशमधील सामग्री बदलत राहिली. मोमोज डिश तिबेटहून नेपाळला गेली तेव्हा बनवण्याची पद्धत आणि त्यातील घटक थोडे वेगळे होते. ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये मोमोजचा अर्थ – वाफेवर शिजवलेली तिबेटियन डिश जी मांस आणि भाज्या एकत्र करून तयार केली जाते. नेपाळमधील काठमांडूमध्ये सर्वप्रथम मोमोज डिश मिळायला सुरुवात झाली.

असे म्हणतात की, तिबेटमधील व्यापाऱ्यांनी मोमोज काठमांडूमध्ये आणले. मोमोजच्या उत्पत्तीबद्दल अचूक माहिती मिळविणे थोडे कठीण आहे. वस्तुतः असे मानले जाते की, तिबेटची संस्कृती आणि अन्न चीन आणि मंगोलने प्रभावित आहेत. म्हणूनच असे म्हटले जाते की, मोमोज देखील चीनहून तिबेट येथे आले होते.

मोमोज सर्वाधिक प्रमाणात तिबेटमध्ये खाल्ले जातात. शिलांगमध्ये नॉन- व्हेज मोमोज तयार केले जातात आणि ते मोमोज खूप प्रसिद्ध आहेत. शिलांग व्यतिरिक्त अरुणाचलचे मोमोसुद्धा खूप लोकप्रिय आहेत. ही डिश येथे उत्साहाने खाल्ली जाते. येथे मोमोज मोहरीची पाने व इतर भाज्या टाकून बनवतात, जेणेकरून ते आरोग्यासाठी फायदेशीर राहील. मोमोजला चीनमध्ये डिसमिस म्हणतात. येथे मांसासोबत इतर भाज्यादेखील टाकल्या जातात. म्हणजेच या गोष्टी मोमोच्या आत भरल्या जातात. आता तर तेलात तळलेले मोमोज (fried momos) खाण्याचा ट्रेंडही वाढत आहे. दिल्ली आणि इतर शहरांमध्ये fried momosचे ट्रेंड वाढले आहे.

हे पण वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.