fbpx
8.3 C
London
Sunday, February 5, 2023

#HealthFit : शाकाहारी असलात तरी चिंता नाही, ‘या’ व्हेज अन्नघटकांमधून मिळेल शरीराला भरपूर प्रोटीन

सध्याच्या काळात प्रत्येकाला फिट रहावेसे वाटते. प्रत्येकजण आपल्या आरोग्याची आणि फिटनेसची काळजी घेत असतो. शहरी भागातही धावत्या जीवनशैलीतून अनेकजण स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम करतात. तर काहीजण योगासंनाचा अभ्यास करतात. मात्र सुदृढ शरीरासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी केवळ व्यायाम पुरेसा नसतो. त्यासाठी योग्य आहार देखील घ्यावा लागतो.

बरेचदा जिममध्ये अथवा फिटनेस क्लबमध्ये आपल्याला प्रोटीन युक्त आहार घेण्यास सांगतात. मात्र हा प्रोटीन युक्त आहार घेईचा कसा आणि ते कोणत्या अन्नघटकांमध्ये असते याबाबत आपल्या खूप कमी माहिती असते. खासकरून जे वेगन आहेत. म्हणजे जे शुद्ध शाकाहारी आहेत. अशांना हा प्रोटीन युक्त आहार म्हणजे केवळ मांसाहार असे वाटते. तर काहीजण नेहमी तक्रार करतात की शाकाहारीमध्ये प्रोटीन युक्त घटक कमी आहेत. मात्र हा खूप मोठा गैरसमज आहे. असे काही शाकाहारी अन्नघटक आहेत ज्यात मांसाहारा पेक्षा जास्त प्रोटीन आहे. तर आज आपण त्याचबाबतच थोडा आढावा घेणार आहोत.

अनेकदा आपल्या घरातच असे अन्नघटक असतात ज्यात प्रोटीन मोठ्या प्रमाणत असते. मात्र आपल्या याबाबत ज्ञान नसल्याने आपण बाहेरचे प्रोटीन पावडरचे डब्बे आणून घेत बसतो.

तसे पाहायला गेले तर भारतीय स्वयंपाक घरात कायम डाळी आणि कडधान्य असतात ज्यात प्रोटीन बऱ्यापैकी असते. जर आपण नित्यनियमाने उकडलेली डाळ खाल्लीत तर आपल्याला त्यातून बऱ्यापैकी प्रोटीन मिळेल. तसेच या व्यतिरिक्त अनेक अन्नघटक आहेत ज्यात मुबलक प्रमाणत आपल्याला प्रोटीन मिळू शकत.

पिस्ता : पिस्त्याम्ध्ये खूप प्रमाणत प्रोटीन आहे. आपण जर दररोज काही पिस्ते खाल्लेत तर तुम्हाला नक्कीच यातून तुमच्या शरीराला प्रोटीन मिळेल. असे म्हटले जाते की, एका कप पिस्ते जर तुम्ही खाल्ले तर तुम्हाला यातून 25 ग्रॅॅम प्रोटीन मिळू शकते. सध्या बाजारात पिस्त्याची किंमत ही जास्तच आहे. मात्र जर एखाद्याला जमत असेल तर त्याने जरूर आपल्या आहारात पिस्त्याचा वापर करावा.

बदामचे लोणी : शेंगदाण्याच्या लोण्या पेक्षा बदामच्या लोण्यात सर्वाधिक प्रोटीन असते. याव्यतिरिक्त यामध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह देखील मोठ्या प्रमाणत असते. त्यामुळे तुम्ही जर आपल्या आहारात याचा समवेश करू शकलात तर नक्कीच याचा फायदा होईल. ब्राऊन ब्रेडवर किंवा तुमच्या ओटस डायेटमध्ये आपण जर दोन चमचे बदामचे लोणी घेतले तर त्यातून सहजपणे तुम्हाला 7 ग्रॅॅमपेक्षा जास्त प्रोटीन मिळू शकते.

वाटाणे : मगाशी म्हटल्या प्रमाणे अनेक भारतीयांच्या घरात वाटाणे असतात काही ते वळवून खातात तर काही ते ओले म्हणजेच ताजे असतानाच खातात. या वाटाण्यांंमध्येही खूप प्रमाणात प्रोटीन आहे. तसेच वाटण्यामध्ये आर्जिनिन नावाचा घटक देखील आहे ज्यामुळे स्नायू मजबूत होण्यासाठी मदत होते. त्यामुळे व्यायाम करणाऱ्यांनी आवश्यक आपल्या डायेटमध्ये उकडलेल्या वाटाण्यांंचा समावेश करावा. एक वाटीभर वाटाणे जर आपण खाल्ले तर आपल्याला त्यातून 14 ग्रॅम प्रोटीन मिळू शकते.

तीळ : तीळ खाणे हे एक उत्तम डायेट आहे. तिळात असलेला लिग्नान्स हा घटक तुमच्या शरीरातील चरबी जाळून टाकण्यास मदत करतो. तर यातून शरीराला प्रोटीन देखील मोठ्या प्रमाणत मिळते. तुम्ही जर 2 बारीक चमचे तीळ खाल्ले तर तुम्हाला त्यातून 5 ग्रॅम प्रोटीन मिळू शकते.

सब्जा : पोषक तत्त्वांनी भरलेला सब्जा शरीरासाठीच नाही तर मेंदूसाठीही खूप फायदेशीर असतो. सब्जामध्ये खूप कमी कॅलेरीज असतात त्याचसोबत यात फायबर असतात. सब्जा हा सुपरफूड प्रमाणे असते. यात चार ग्रॅमपर्यंत प्रोटीन, 9 ग्रॅम चांगलं फॅट ज्यात 5 ओमेगा-3 एस असतात. जवळपास 18 टक्के कॅल्शियम आणि 30 टक्के मॅग्नेशिअम असतं.

या व्यतिरिक्त उडीद डाळ, कच्चे शेंगदाणे, पनीर, राजमा, आदि घटकांमधूनही आपल्याला प्रोटीन मिळू शकते. तर या पदार्थांचे सेवन केल्याने तुमच्या कार्यक्षमतेतही वाढ होऊ शकते.

हे पण वाचा

मद्यपान शरीरासाठी फायदेशीर, दारूचे हे गजब फायदे वाचून तुम्हीही चकित व्हाल…

आज्जीचा बटवा:  विड्याच्या पानांचे ‘हे’ औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का ?

आज्जीचा बटवा : मुखशुद्धीसाठी असलेली विलायची आहे अधिक गुणकारी, जाणून घ्या फायदे….

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here