युरियामुळे एकेकाळी खुश असणारा शेतकरी आता गाळतोय दु:खाश्रु, जमिनी ओसाड व उत्पन्नात घट
सध्याचे शेतकरी युरियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असलेले पाहायला मिळत आहेत. त्यातच युरिया या खताचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण या युरियाने मागील काळात शेतकऱ्यांचे पीक खूप पटींनी वाढवले. आणि आता त्याच शेतकऱ्यांना युरिया रक्ताचे अश्रू रडवत आहे. कारण आता उत्पादन कमी होत आहे आणि जमीन दिवसेंदिवस ओसाड होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
युरियामध्ये नायट्रोजन असतो. नुकताच काही दिवसांपूर्वीचा अभ्यास समोर आला आहे. यात पहिल्यांदाच भारतातील नायट्रोजनच्या स्थीतीचे मुल्यांकन केले गेले. त्यात असे दिसले की युरिया अत्याधिक वापर केल्याने नायट्रोजन सायकल आणि मानवी जीवनावर व पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असलेले दिसून येत आहे. हे हे परिणाम नेमके कोणते आहेत आणि त्याचे उपाय कोणते आहेत हे आपण जाणून घेऊयात.
युरियाचे मानवी जीवनावर होणारे वाईट परिणाम
१. भविष्यात समुद्र ,तलाव आणि वने यांच्यासारख्या वेगवेळया पर्यावरणास नायट्रोजन प्रदुषणने खूप मोठ्या प्रमाणावर दूषित केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा त्याचा सगळ्यात जास्त फटका मानवी जीवनावरच होणार आहे.
२. युरियाचा जास्त वापर केल्याने अन्नधान्यातील पोटॅशियम कमी होते. पण पोटॅशियम आपल्या हदयाला निरोगी ठेवण्याचे काम करते व रक्त दाब देखील नियंत्रित ठेवते.
३. ब्लू बेबी सिंद्रम हा रोग असलेल्या सहा महिनापर्यंतच्या बालकांसाठी पिण्याच्या पाण्यात नायट्रोजन प्रदूषण झाले असेल तर धोकादायक ठरू शकते. हा रोग असलेल्या मुलांच्या रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. कारण नायट्रोजनमूळे हिमोग्लबीनकमी होते. त्यामुळे मुलांमध्ये वारंवार अतिसार होवू शकतो हे श्वसन कार्य देखील प्रतिबंधित करूते तसेच त्यामुळे रक्तदाब देखील वाढतो.
उपाय
१. नायट्रोजन खतांचा वापर कमी करून आणि सेंद्रिय खतांचा पुनर्वापर केल्याने भारतीय शेतकरी सुरक्षित अन्न उत्पादन करू शकतील.
२. त्याच प्रमाणे नायट्रोजनचे प्रमाण कमी केल्याने मातीची रचना सुधारण्यास खूप मोठ्या प्रमाणावर हातभार लागेल.
३. दुष्काळाची लवचिकता व मातीची धूप आणि हवामानाशी संबंधित ईतर धोका कमी होईल.
– शोभा गुंड
हे पण वाचा