fbpx
8.3 C
London
Sunday, February 5, 2023

जाणून घ्या ! त्वचेला तरूण ठेवणारे कोलेजन नेमकं आहे तरी काय ? शरीरात त्याची मात्रा कशी वाढवाल…

आपण कोलेजेनबद्दल बरेच वेळा ऐकले असेल, परंतु कोलेजेनचे कार्य काय आहे हे आपल्याला माहिती आहे काय? सोप्या भाषेत, हे समजून घ्या की कोलेजन आपल्या त्वचेच्या संरचनेमध्ये 70 टक्के भागीदार असतो. शरीरात कोलेजन नसल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसतात. या लेखात, आपण जाणून घेणार आहोत की, कोलेजन काय आहे? कोलेजन आहार वापरुन त्वचा कशी सुधारली जाऊ शकते? कोलेजन कोणत्या पदार्थात आढळतात?

कोलेजन म्हणजे काय?

कोलेजन एक प्रकारचे प्रोटीन आहे. जे आपल्या त्वचेमध्ये आणि कनेक्टिव्ह टिशूमध्ये आढळते. मानवी शरीरात कोलेजन 30% आढळते. कोलेजेनमध्ये ग्लाइसीन, प्रोलिन, हायड्रॉक्सिप्रोलिन, लाइझिन आणि आर्जिनिन सारख्या 19 अमीनो अॅॅसिड असतात. तसेच, 29 प्रकारचे कोलेजेन आढळतात. मानवी शरीरात मुख्यतः प्रथम ते तृतीय प्रकारचे कोलेजेन आढळतात. प्रथम प्रकार प्रामुख्याने त्वचा, कंडरे, नसा, अवयव आणि हाडे यांमध्ये असते. दुसरा प्रकार कार्टीलेजमध्ये आढळते आणि तिसरा प्रकार रेटिकुलर फायबरमध्ये असते.

कोलेजन डाएट हा एक आहार आहे ज्यामध्ये साखर आणि कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ टाळून कोलेजन समृद्ध असलेले पदार्थ खावे. कोलेजन डाएटचे सेवन केल्याने तरूणपण, ऊर्जा आणि सौंदर्य टिकून राहते. कोलेजन आहार व्यतिरिक्त, आपण कोलेजन सप्लिमेंट्स किंवा कोलेजन इंजेक्शन घेऊ शकता. पण स्प्लिमेंट्स आणि इंजेक्शन हे डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावे.

शरीरात कोलेजन कमी असल्याने काय समस्या होऊ शकतात?
वाढत्या वयासोबत कोलेजेनचे शरीरामध्ये उत्पादन कमी होते. त्वचेचा एपीडर्मल थिकनेस कमी होतो. यामुळे त्वचेचे नुकसान होते आणि त्वचेवर सुरकुत्या येणे, सूज येणे यांसारखे त्रास होऊ शकतात. स्नायू संकुचित होऊ शकतात आणि कमकुवत होऊ शकतात. सांधेदुखी, ऑस्टियोआर्थरायटीस आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या देखील होऊ शकतात. कोलेजनच्या कमतरतेमुळे केसांची वाढ होणे कमी होते आणि केस पातळ होतात.

collagen (1)

कोलेजन डाएटचे फायदे:

कोलेजन आहार घेतल्यास आरोग्याचे बरेच फायदे आहेत.

 • त्वचा टोन्ड असते.
 • केस कमी गळतात.
 • छान झोप येते.
 • हाडे स्वस्थ होतात.
 • इम्युन सिस्टीम चांगली होते.
 • वजन नियंत्रणात मदत होते.
 • मूड स्विंग होणे कमी होते आणि मन शांत राहते.

कोलेजन डाएटमध्ये खाल्ली जाणारी फळे:

 • सीट्रस फ्रुट

सीट्रस फ्रुट म्हणचे आंबट फळे, सीट्रस फ्रुटमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. प्रो-कोलेजन तयार करण्यात व्हिटॅमिन-सी महत्वाची भूमिका निभावते. यासह व्हिटॅमिन सी शरीराला कोलेजन तयार करण्यास उत्तेजित करते. शरीरास संपूर्ण व्हिटॅमिन-सी मिळणे अवघड आहे. यासाठी आपण आपल्या आहारात संत्री, द्राक्षे, लिंबू यासारख्या सीट्रस फळांचा समावेश करावा.

 • बेरीज

बेरीमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. बेरीमध्ये आपण स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, रास्पबेरी इत्यादी खाऊ शकता. आपण एक कप बेरी खाल्ल्यास, आपल्याला संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन-सी मिळते. याव्यतिरिक्त, बेरीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. अँटी-ऑक्सिडेंट त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.

 • हंगामी फळे

व्हिटॅमिन-सी आंबा, कीवी, अननस आणि पेरू यासारख्या बर्‍याच हंगामी फळांमध्ये आढळतो. पेरूमध्ये जस्त देखील आढळतो. कोलजेन तयार करण्याच्या प्रक्रियेत जस्ट व्हिटॅमिन-सी चा सह-घटक म्हणून कार्य करतो.

 • लसूण

लसूणमध्ये बरेच नैसर्गिक गुणधर्म आहेत. लसूण अन्नाची चव वाढवतो. लसूणमध्ये सल्फर आढळते. सल्फर एक आवश्यक खनिज आहे, जो कोलेजनच्या विघटनास प्रतिबंधित करतो. परंतु याचा अर्थ असा नाही की लसूण आपल्याला पाहिजे तितके खाऊ शकता. जास्त प्रमाणात लसूण सेवन केल्याने आपल्या छातीत जळजळ होऊ शकते. आपण किती लसूण खावे यासाठी आपण आपल्या डॉक्टरांशी किंवा आहारतज्ञाशी संपर्क साधू शकता.

 • हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करून, आपण कोलेजन डाएटचे चांगले पालन करू शकता. हिरव्या पालेभाज्या निरोगी आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. हिरव्या पालेभाज्यांमध्ये क्लोरोफिल आढळते. क्लोरोफिलमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. काही संशोधनातून असे दिसून आले आहे की, क्लोरोफिलच्या सेवनाने त्वचेमध्ये कोलेजन तयार होते.

 • बीन्स

बीन्समध्ये प्रथिने जास्त असतात. तसेच त्यात अमिनो अॅॅसिड कमी प्रमाणात आढळतात. कोलेजेनला सिंथेसाईझ करण्यासाठी एमिनो अॅॅसिड आवश्यक आहेत.

 • काजू

काजू खायला कोणाला आवडणार नाही. काजू खाल्ल्याने तुम्हाला झिंक व कॉपर मिळते. कोलेजनच्या निर्मितीमध्ये जस्त आणि तांबे उपयुक्त ठरू शकतात. तर तुम्ही स्नॅकमध्ये काजू खाऊ शकता.

 • टोमॅटो

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. टोमॅटोमध्ये जवळजवळ 30 टक्के महत्त्वपूर्ण पोषक घटक आढळतात, जे कोलेजन तयार करण्यासाठी आवश्यक असतात. टोमॅटोमध्ये लाइकोपीन देखील आढळते. लाइकोपीन अँटी-ऑक्सिडंट्सपैकी एक आहे, जे त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो. म्हणून, आपण दररोज दोन टोमॅटो कच्चे किंवा शिजवलेले खाऊ शकता.

 • अंडी

अंडी अल्बमिनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोलिन आढळतो. प्रोलिन हा एक प्रकारचा अमीनो अॅॅसिड आहे, जे कोलेजन तयार होण्यास मदत करते.

 • चिकन

चिकन कोलेजनने समृद्ध आहे. म्हणूनच बहुतेक कोलेजन स्प्लिमेंट्स चिकनपासून बनविलेले असतात. कोंबडीचे पांढरे मांस पूर्णपणे संयोजी ऊतकांनी बनलेले असते. चिकनचे सेवन केल्याने संयोजी ऊती आपल्या शरीरात जातात आणि कोलेजेनची अधिक प्रमाणात निर्मिती करतात.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here