#CoronaSideEffect : कोरोना झाल्यावर का होतीये केशगळती ? संशोधनातून आले समोर
कोरोना विषाणूची लक्षणे प्रत्येकामध्ये वेगवेगळी असलेली पहायला मिळाली आहेत. काही लोक घसा खवखव, ताप आणि सर्दीची तक्रार करतात आणि काही लोकांमध्ये वास आणि चव घेण्याची क्षमता अचानक निघून जाते. या सर्वांव्यतिरिक्त, आता कोरोनाच्या रूग्णांमध्ये आणखी एक बाब दिसून येत आहे आणि ती म्हणजे केसांचे जास्त प्रमाणात नुकसान. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर केस का लवकर गळू लागतात याविषयी माहिती प्राप्त झाली आहे.
या अभ्यासासाठी अमेरिकेच्या इंडियाना युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर डॉ. नेटली लॅमबर्ट यांच्या पथकाने 1500 लोकांचे सर्वेक्षण केले. सर्व्हेमध्ये सामील झालेल्या सर्व लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि बरे झाल्यानंतरही, विषाणूचा परिणाम त्यांच्यावर बर्याच दिवसांवर होता. या सर्वांनी केस जास्त गळत असल्याची तक्रार केली आहे.
सर्वेक्षणात संशोधकांना असे आढळले आहे की, केस गळणे हे कोरोना विषाणूच्या 25 लक्षणांपैकी एक आहे. या सर्वेक्षणात सामील झालेल्या कोरोना रूग्णांपैकी बर्याच जणांनी नोंद घेतली की त्यांना उलट्या किंवा सर्दीपेक्षा केस गळतीची समस्या जास्त जाणवली. हे सर्व लोक आभासी मार्गाने सर्व्हेमध्ये सहभागी झाले होते.
कारण काय आहे – तज्ञ म्हणतात की, आजारपणात केस गळणे हे ताण किंवा धक्क्याशी संबंधित आहे. या स्थितीस टेलोजेन इफ्लुव्हियम देखील म्हणतात. टेलोजेन इफ्लुव्हियममध्ये काही रोग, धक्का किंवा तणावमुळे केस काही काळ वेगाने गळू लागतात. याव्यतिरिक्त संसर्गाच्या वेळी शरीरात पोषक तत्वांचा अभाव असतो, ज्यामुळे केस गळणे देखील सुरू होते. मात्र कोरोना विषाणूच्या संबंधात या दोन्ही गोष्टींचा पुढील अभ्यास करणे आवश्यक आहे.
तज्ञ म्हणतात की, केस काही काळापर्यंत गळत राहतील. हे टाळण्यासाठी कोरोनाच्या रूग्णांनी ताण घेऊ नये. या व्यतिरिक्त आहाराकडेही लक्ष दिले पाहिजे. लोह आणि व्हिटॅमिन डी असलेल्या गोष्टी खा आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करा. काही दिवसांनंतर केस गळण्याची समस्या आपोआपच बंद होईल.