fbpx

Zee 5 ने बाजारात आणला नवीन प्लॅॅन, 365 रुपयात आता वर्षभराचे सबस्क्रिप्शन

0

नेटफ्लिक्सनंतर Zee 5 ने आज Zee 5 क्लब नावाची आपला नवीन एन्ट्री-लेव्हल सबस्क्रिप्शन प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅनमध्ये , दर्शकांना Zee आणि ALTबालाजी मधील निवडक कार्यक्रमांसह 1000 हून अधिक चित्रपट, झी झिंदगी शो आणि 90 हून अधिक लाइव्ह टीव्ही शोज पहायला मिळतील. खास गोष्ट म्हणजे तुम्हाला हे सर्व फक्त 365 रुपयांच्या किंमतीवर मिळणार आहे, तेही संपूर्ण वर्षभर.

ही योजना ZEE 5 च्या सध्याच्या वार्षिक योजनेपेक्षा खूपच स्वस्त आहे. सध्या ZEE 5 ची वार्षिक सदस्यता 999 रुपयांमध्ये मिळते. ZEE 5 ची ही नवीन स्कीम डिस्नी हॉटस्टार प्रमाणेच आहे.

ZEE 5 क्लबने असा दावा केला आहे की, ZEE 5 चे विविध युजर्स , रिज़नल रेफ्रन्स आणि व्ह्यूअरशिप पॅटर्न यांना लक्षात घेऊन ही स्कीम आणली आहे. हे संपूर्ण ओटीटी टेलिव्हिजन एन्टरटेन्मेंट पॅक म्हणून स्थित आहे. Zee5 All Access या स्कीममुळे युजर झी एक्सक्लुझिव्ह आणि एएलटीबालाजीचे शो, चित्रपट, झी झिंदगी शो, किड कंटेंट आणि लाइव्ह टीव्ही चॅनेल्स इत्यादी सर्व प्लॅटफॉर्मवर प्रवेश करणार आहे.

ZEE All Access प्लॅनची ​​वार्षिक फी 999 रुपये आहे, तर मासिक फीही तुम्हाला 99 रुपये द्यावे लागतील. आपण याची सदस्यता तीन महिने आणि सहा महिने देखील घेऊ शकता. आपल्याला तीन महिन्यांसाठी 299 रुपये आणि सहा महिन्यांसाठी 599 रुपये द्यावे लागतील.

काय आहे नेटफ्लिक्सचा नवीन प्लॅॅन ?

नेटफ्लिक्सने भारतात काही नवीन आणि विद्यमान ग्राहकांसाठी ‘Mobile+’ प्लॅॅन सुरू केला आहे. हा प्लॅॅन 349 रुपयांचा असणार असून यामध्ये दर्शकाला स्ट्रीम कन्टेन्ट हा फुल HDमध्ये पाहता येणार आहे. तसेच या प्लॅॅनमध्ये स्ट्रीम होणारा कन्टेन्ट हा मोबाईल, टॅॅबलेट्स, कॉमप्युटरवर पाहता येणार आहे. यानंतर नेटफ्लिक्स 200 रुपयांचा ‘Mobile Only’ प्लॅॅनही बाजारात आणणार आहे. या प्लॅॅनमध्ये दर्शकाला स्ट्रीम होणारा कन्टेन्ट हा केवळ मोबाईलवर पाहता येणार आहे. तर याची क्वालिटी SD म्हणजे 480p असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.