New Year 2021 Wishes: या नववर्षाच्या मुहूर्तावर आपला मित्रपरिवार, नातेवाईकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊया.
2020 संपून सुरुवात झाली 2021 वर्षाची. त्यामुळे नवी आशा, नव्या उत्साहाने त्याचे स्वागत करूया. सोबत सुंदरशा शब्दांनी, मेसेजेस ने आपला मित्रपरिवार, नातेवाईकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊया. हे वर्ष एक आशा घेऊन आले आहे की, सगळे काही ठीक होईल. चला तर मित्रांनो शुभेच्छानी स्वागत करूया नवीन वर्षाचे..
भोवर्यातून बाहेर पडून किनारा मिळाला,
जगण्याला आज एक नवा अर्थ मिळाला,
चढ- उतार्यांनी भरलेले होते हे वर्ष,
या नव्या वर्षी परत एकदा तुझी साथ मिळाली
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
हे आपल नातं असंच राहु दे,
मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहु दे
खूप सुंदर असा प्रवास होता 2020 वर्षाचा
2021 मध्येही अशीच सोबत कायम राहू दे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सरतं वर्ष जातय आपल्यापासून दूर
नव्या वर्षात संपून जाऊ देत शंका- कुशंका, राग-रुसवे
तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्वांच्या हृदयात असुदे प्रेमाची भावना
नव्या वर्षात पुरी होऊ दे अधुरी ही कहाणी
हीच प्रार्थना करते होऊन नतमस्तक
गरिबांना मिळू दे अन्न- वस्त्र आणि निवारा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष प्रकाश बनून आलंय आपल्या जीवनात
या वर्षात उजळून जाऊदे भाग्याची ही रेषा
परमेश्वराची कृपा राहो सर्वांवरती खास
तुमच्या उपस्थितीने लखलखुदे हे जीवन आज
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे साल तुमच्यासाठी ठरो आनंदाची पर्वणी
आयुष्यातील प्रत्येक क्षण उजळू दे क्षणोक्षणी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year Marathi wishes 2021:नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2021
*तुमच्या या मैत्रीची साथ*
*यापुढे ही अशीच कायम असू द्या…*
संकल्प करूया साधा, सरळ, सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया
हृदयाचा एक छोटासा कप्पा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
नवीन वर्षात पदार्पण करताना खूप मोठे ध्येय पार करायचे आहे काहीतरी
नवीन करायचे आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
पाहता-पाहता दिवस उडुन जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी
आयुष्यातील आणखी एक अनमोल वर्ष समाप्ती, या आयुष्याच्या प्रवासात प्रवास करताना खूप काही कमावलं तर खूप गमावलं देखील आता काय कमावलं अन काय गमावलं हे शोधण्यापेक्षा नवीन काहीतरी उमेद आणि संकल्प घेऊन 2021 मध्ये प्रवेश करूया. या सरत्या वर्षात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व. आपली साथ नेहमीसारखी माझ्याबरोबर आयुष्यभर असेल अशी आशा करतो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
बदल हा निसर्गाचा नियम आहे जुना ऋतूत झाडाची जुनी पाने गळून त्याला नवी पालवी फ़ुटते. काळाच्या महावॄक्षावरुन देखील जुने दिवस गळून पडतात. आणि त्याला नव्या दिवसांची पालवी फ़ुटते. नवा बहर,नवा मोहोर. नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला, नव्या वर्षाचे स्वागत करु या.
डे बाय डे तुझा आनंद होवो डबल, तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल, देव तुला नेहमी ठेवा स्मार्ट आणि फिट, हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट.
आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत…
कळत नकळत २०१९ मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
2021 मध्ये पण तय्यार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…
नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू,
नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.
माझी इच्छा आहे की येणारे 12 महिने सुख मिळो,
52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत माझ्या मित्राचे.
WISH YOU A HAPPY NEW YEAR 2021
प्रत्येक वर्ष कसं
पुस्तकासारखंच असतं ना!
३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…! या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
कोणतंही दुःख कोणतीही उदासी कोणाचंही मन दुखू नये हे
नववर्ष सगळ्यांसाठी घेऊन येऊ भरभरून सुख.
हीच माझी इच्छा आहे मनापासून खूप.
इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year 2021! In Advance Love You भावांनो…
जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुला मिळो,
जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो.
या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा
आनंद राहो तुझ्याजवळ, एकही दुःख न येवो, यश राहो कायम तुझ्याकडे,
ना कधी अपयश येवो, सगळं काही चांगलो होवो फक्त तुझ्यासाठी.
नववर्षाभिनंदन.
*नमस्कार*
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!
सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब.
माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील.
नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
झालं गेलं ते विसरून जा, नव्यावर्षाला जवळ करा. द
ेवाकडे हीच प्रार्थना नव्या वर्षात पूर्ण व्हाव्यात तुमच्या सर्व इच्छा.
हॅपी न्यू ईयर.
ये माझ्या मिठीत तुला देवू दे जादूची झप्पी,
अशीची प्रेमाच्या वातावरणात कटू दे आपली जिंदगी.
विश यू व्हॅरी हॅप्पी न्यू ईयर माय जिंदगी
हे नातं सदैव असंच राहो, मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता 2020 चा प्रवास, अशीच राहो 2021 मध्येही आपली साथ.
या नव्या वर्षात जे तू मागशील ते व्हावं तुझं,
प्रत्येक दिवस व्हावा सुंदर आणि रात्री व्हावा प्रकाशमय.
यशाने द्यावी तुला साथ नव्या वर्षाच्या तुला शुभेच्छा खास.
गेलेल्या दिवसासोबत आपणही विसरूया सारे हेवेदावे,
नव्या वर्षाच्या उत्साहात करूया नवी सुरूवात.
नववर्षाभिनंदन.
कोणीही भूतकाळात जाऊन सुधारणा करू शकत नाही.
पण नवीन सुरूवात करून एक यशस्वी शेवट मात्र नक्की करू शकतो.
हॅपी न्यू ईयर.
“यावर्षी आपल्या घरात आनंद,
संपत्तीची कमतरता असू नये, आपण श्रीमंत व्हा,
हसत रहा, प्रत्येकजण असेच आहे,
“ मनापासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा! “
नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना…
नवीन वर्षाच्या शुभेच्छा