fbpx
-1.2 C
London
Thursday, December 8, 2022

Shardiya Navratri 2020 Message in Marathi घटस्थापना व शारदीय नवरात्रीनिमित्त द्या मराठी भाषेतून शुभेच्छा संदेश

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढील नऊ दिवस म्हणजे नवरात्र. देवीच्या विविध रुपांच्या उपासनेचा आणि साधनेचा हा काळ. महिषासुर नावाचा राक्षस सर्व लोकांचा छळ करत होता. तेव्हा ब्रम्हा, विष्णु, महेश यांच्या दिव्य तेजातून एक दैवी शक्ती निर्माण झाली. वाघावर बसलेल्या अष्टभुजा देवीचे रुप घेऊन तिने नऊ दिवस महाषासुरांशी युद्ध केले आणि दसऱ्याच्या दिवशी त्या राक्षसाचा वध केला. म्हणून नवरात्र. या नऊ रात्री दैवी शक्तीची आराधना केली जाते. यंदा 17 ऑक्टोबर, शनिवार पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे.

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढील नऊ दिवस म्हणजे नवरात्र. देवीच्या विविध रुपांच्या उपासनेचा आणि साधनेचा हा काळ. यंदा शनिवार, १७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. घरोघरी घट बसतील. मोठ्या उत्साहाचा आणि आनंदाचा हा काळ असतो.

या दिवशी सार्वजनिक मंडळांमध्ये देवीचे आगमन होईल. घरोघरी घट बसतील. देवींच्या मंदिराबाहेर या काळात लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. मोठ्या उत्साहाचा आणि आनंदाचा हा काळ असतो. गरबा, दांडिया यांची धूम सर्वत्र पाहायला मिळते. शारदीय नवरात्रोत्सव संपूर्ण भारतात अगदी धुमधडाक्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रात घट बसवतात. अष्टमीला होम करतात. गुजरातमध्ये देखील घट बसवून अगदी दणक्यात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. बंगालमध्ये दुर्गापूजेचा मोठा उत्सव पाहायला मिळतो. केरळमध्ये नवरात्री व दसरा हे दिवस ओनम सणाच्या रुपाने साजरे होतात. नावं, चालीरीती, परंपरा वेगवेगळी असली तरी वाईट प्रवृत्तींवर मात करण्यासाठी अखंड लढा देणे ही शिकवण या सणातून मिळते.

यंदा करोना संकटाचे सावट असल्याने नवरात्रोत्सवाला अत्यंत साधे स्वरुप प्राप्त झाले आहे. विविध नियमांचे पालन करत नवरात्रोत्सव साजरा करावा लागणार आहे. असे जरी असले तरी उत्सवाचा उत्साह कायम आहे आणि तो टिकून ठेवण्यासाठी सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर माध्यमातून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. नवरात्रोत्सवानिमित्त खास मराठमोळे शुभेच्छा संदेश खास तुमच्यासाठी…

नारी तू नारायणी, नारी तू सबला
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी, नमितो आम्ही तुजला
शुभ नवरात्री!

 

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते..
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना..!

 

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
घटस्थापनेच्या मंगलमय शुभेच्छा!

 

लक्ष्मीचा वरदहस्त
सरस्वतीची साथ
माता दुर्गेच्या आशीर्वादाने
तुमचे जीवन होवो आनंदमय
नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

अंबा मातेची नऊ रुपं तुम्हांला
कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती
आणि शांती देवो!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

नवरात्रीच्या मंगल पर्वावर
माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी,
सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो, हीच प्रार्थना…
शुभ नवरात्री!

 

उत्सव नवरात्रीचा
ओसांडून वाहूदे आपल्या जगतात,
महापूर नाविन्याचा अन् आनंदाचा
घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

अंबा, माया, दुर्गा, गौरी
आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल माझ्याच घटी
विश्वाची स्वामिनी जगतजननी
नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा : सण समारंभ यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन स्टिकर्स डाऊनलोड करा आणि आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासह शेअर करा.

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. अनेक देवीभक्तांचा उपवास असतो. नवरात्रीच्या काळात ठराविक रंगाचे कपडे घालण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून पुढे आला आहे आणि दरवर्षी त्याला उदंड प्रतिसाद पाहायला मिळतो. यंदा तर मॅचिंग मास्कही बाजारात पाहायला मिळत आहेत. कोविड-19 संकट असले तरी तुम्ही खबरदारी घेऊन नवरात्रोत्सव अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करा. IMP मराठीकडून नवरात्रोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here