#WomenPower :पुरुषांना लाजवेल अशी कामगिरी, 2020मध्ये ‘या’ महिलांनी कमावली अब्जावधी संपत्ती

0

जगभरात धनाड्य आणि श्रीमंत लोकांची कमतरता नाही.या श्रीमंत लोकांमध्ये असे अनेक लोक आहेत, ज्यांनी आपल्या परिश्रम आणि शहाणपणाने संपत्ती मिळविली आहे, असे अनेक लोक आहेत ज्यांना ही संपत्ती वारसात मिळाली आहे.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही अशा अव्वल श्रीमंत व्यक्तींची माहिती घेऊन आलोय ज्यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर चांगलीच संपत्ती कमावली आहे. आणि विशेष म्हणजे या सर्व महिला आहेत. हो ! आज आम्ही तुम्हाला जगातल्या अशा महिलांची माहिती देणार आहोत त्या पुरुषांपेक्षा धनिक आणि श्रीमंत आहेत.

प्रत्येकाला माहित आहे की महिला कोणत्याही क्षेत्रात आता कमी राहिलेल्या नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या देखील आता आपले कर्तुत्व आणि हुशारी दाखवत आहेत. अभियांत्रिकी, बँकिंग क्षेत्र, राजकारण, व्यवसाय, सिनेमा किंवा इंटरनेट असो अशा सर्वच क्षेत्रात महिला आता कार्यरत आहेत. त्यामुळे आता महिला देखील पुरुषांना मागे टाकत श्रीमंतीची शिखर गाठत आहेत. अमेरिकन मासिक फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, सन 2020 मध्ये जगात एलिस वॉल्ट्न, फ्रान्सॉईस बॅॅटनकोर्ट, ज्युलिया कोच, मॅकेंज़ी बेज़ोस, जैकलीन मार्स या पहिल्या पाच श्रीमंत महिला आहेत.

काय आहेत यांचे व्यवसाय ?

एलिस वॉल्टन

जगातील सर्वात मोठी रिटेल मार्केट, वॉलमार्टचे (WallMart) संस्थापक सॅम वॉल्टन यांची मुलगी एलिस वॉल्टन या जगातील सर्वात श्रीमंत महिला आहे.

सन 2020 मध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील दहा श्रीमंत महिलांच्या यादीत या पहिल्या स्थानावर आहे आणि त्यांच्याकडे एकूण 54.4 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

alice-walton-

जरी एलिसला तिची वडिलोपार्जित संपत्ती म्हणून वॉलमार्टचा हिस्सा मिळाला असला तरी तिची विशेष आवड कला संवर्धन आणि समाजसेवा क्षेत्रात आहे.

2011 मध्ये त्यांनी क्रिस्टल ब्रिज म्युझियम ऑफ अमेरिकन आर्टची स्थापना केली. यासह त्यांनी अमेरिकेच्या आरोग्य क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी एक विशाल रुग्णालय स्थापनेची घोषणा केली आहे.

 

फ्रान्सॉईस बॅॅटनकोर्ट

जगप्रसिद्ध फ्रेंच सौंदर्यप्रसाधने बनवणारी कंपनी लॉरियल (L’Oreal) ची मालकीण फ्रान्सॉईस बॅॅटनकोर्ट या सध्या जगातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत.

सन 2020 मध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील दहा श्रीमंत महिलांच्या यादीत फ्रान्सॉईस दुसर्‍या क्रमांकावर असून त्यांच्याकडे एकूण 48.9 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. लॉरियल कंपनीची स्थापना फ्रान्सियोसचे आजोबा यूजीन शुलर यांनी 1909 मध्ये केली होती. यूजीन शुलर यांच्या मृत्यूनंतर या कंपनीचा पदभार फ्रान्सोइसची आई लिलियन बॅॅटनकोर्ट यांनी स्वीकारला आणि 2017मध्ये लिलियन बॅॅटनकोर्टच्या निधनानंतर फ्रान्सॉईस बॅॅटनकोर्ट या लॉरियलच्या मालकीण झाल्या.

फ्रान्सॉईस बॅॅटनकोर्ट

ज्युलिया कोच

कोच इंडस्ट्रीज या व्यापारी कंपनीचे माजी मालक डेव्हिड कोच यांच्या पत्नी ज्युलिया कोच या सध्या जगातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. सन 2020 मध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील दहा श्रीमंत महिलांच्या यादीत ज्युलिया कोच तिसऱ्या क्रमांकावर आहेत आणि त्यांच्याकडे एकूण 38.2 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. 2019 मध्ये पतीच्या निधनानंतर ज्युलिया यांना कोच इंडस्ट्रीजमधील 46 टक्के हिस्सा मिळाला. या कारणास्तव, त्यांंचे नाव वर्ष 2020 च्या फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट केले गेले. कोच इंडस्ट्रीज अभियांत्रिकी आणि रासायनिक उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. ज्युलिया यांचे पती डेव्हिड एक व्यवसायिक तसेच एक राजकारणी, समाजसेवक आणि रसायन अभियंता होते.

Julia Koch

मॅकेन्झी बेझोस

जगातील सर्वात श्रीमंत माणूस आणि अ‍ॅमेझॉन संस्थापक जेफ बेझोस यांची पहिली पत्नी मॅकेन्झी बेझोस (आताचे नाव मॅकेन्झी स्कॉट) या जगातील चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत. 2020मध्ये त्यांची एकूण संपत्ती 36 बिलियन डॉलर इतकी आहे. 48 वर्षीय मॅकेन्झीने जगातील सर्वात महाग घटस्फोट घेतला आहे. मॅकेन्झी यांना कंपनीचे 25% समभाग मिळाले आहेत. मॅकेन्झी देखील अ‍ॅमेझॉनच्या पहिल्या कर्मचारी होत्या. मॅकेन्झी एक कादंबरीकार आहे. मॅकेन्झी यांनी डी टेस्टिंग ऑफ ल्यूथर अल्ब्राइट आणि ट्रॅप्स यासह अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. विशेष म्हणजे अ‍ॅमेझॉनच्या यशामध्ये मॅकेन्झीची प्रमुख भूमिका आहे.

मॅकेन्झी बेझोस

2019 मध्ये जेफ बेझोसकडून घटस्फोट घेतल्यानंतर मॅकेन्झी यांना 36 अब्ज डॉलर्सची भरपाई मिळाली, त्यानंतर त्यावर्षी त्या जगातल्या पाचव्या श्रीमंत महिला ठरल्या. तथापि, वैयक्तिकरित्या कादंबरीकार, उद्योजक आणि समाजसेवी मॅकेन्झी यांनी जाहीर केले आहे की ती आपल्या संपत्तीपैकी निम्मे संपत्ती सामाजिक संस्थांना दान करणार आहेत.

जॅकलिन मार्स

अमेरिकीन मल्टीनॅॅशनल कंपनी मार्स इंकॉर्पोरेटेड यांचे संस्थापक फ्रँकलिन मार्स यांची नात ही जॅकलिन मार्स 5 वी सर्वात श्रीमंत महिला आहे. सन 2020 मध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील दहा श्रीमंत महिलांच्या यादीत जॅकलिन पाचव्या स्थानावर असून तिची एकूण संपत्ती 24.7 बिलियन डॉलर आहे. मार्स इंकॉर्पोरेटेड कंपनी आपल्या चॉकलेट, कँडी, खाद्य उत्पादने, पेये आणि मिठाई इत्यादींसाठी जगभरात ओळखली जाते.

जॅकलिन मार्स

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.