Online Banking: सुरक्षित ऑनलाईन बँकिंगसाठी ५ महत्वाच्या टिप्स

0

ऑनलाईन बँकिंगच्या साहाय्याने (Online Banking) पैशासंबंधीचे सर्व व्यवहार चुटकीसरशी होऊ लागले आणि हा बदल आर्थिक जगताला कलाटणी देणारा ठरला. वेळ, बिनचूकता, निश्चितता, सहजता अशा सगळ्या पातळीवर ‘ऑनलाईन बँकिंग’ खरी उतरली. परंतु, या प्रगत तंत्रज्ञानामुळे चोरी, दरोडा अशा पैशासंबंधीच्या गुन्हेगारीला इथून पुढे चाप बसणार अशी खात्री वाटत असतानाच ‘सुरक्षितता’ हा महत्वाचा  मुद्दा नव्याने निर्माण झाला. सायबर क्राईम आणि सुरक्षित ऑनलाईन बँकिंग पद्धती यांचा थोडासा अभ्यास आणि जागरूकता खूप मोठं नुकसान टाळू शकतात.

सध्या कोरोनाच्या काळात ऑनलाईन व्यवहार वरदान ठरले असले, तरी अपुऱ्या माहितीमुळे किंवा सावधगिती न बाळगल्यामुळे अनेकांचे बँक खाते रिकामे होत आहे. बारा महिने चौवीस तास बँकिंगची सोय, मोबाईल किवा कम्पुटरच्या एका क्लीक वर झटपट होणारे व्यवहार हे सहज सोपं वाटत असलं, तरी प्रत्यक्षात असे व्यवहार करताना सतर्क राहणे गरजेचे आहे. आजच्या लेखात आपण इंटरनेट बँकिंगचे धोके कसे टाळावे, यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया 

हे नक्की वाचा: युपीआय (UPI) च्या माध्यमातून व्यवहार करताय ? सावधान…

Online Banking: संभाव्य धोके 

१. ट्रोजन:

 • ट्रोजन म्हणजे इंटरनेट व्हायरस. जो इंटरनेट ब्राउझिंग करताना किंवा असुरक्षित वेबसाइट्सवरून काही डाउनलोड करताना आपल्या संगणकावर येतो.
 • एकदा आपल्या सिस्टममध्ये ट्रोजन शिरला की मालवेअर आपल्या ऑनलाइन व्यवहारांवर लक्ष ठेवते आणि पासवर्ड/ क्रेडिट कार्ड नंबर इ. संवेदनशील माहिती वाचते/चोरते.

२. फिशिंग ईमेल:

 • नावाप्रमाणेच हे फसवे ईमेल अधिकृत चॅनेलवरून असल्याचे भासवतात. असे मेलस् एकदा कॉम्पुटरवर आले की मालवेअरकिंवा स्पायवेअरद्वारे ग्राहकांची माहिती, पासवर्ड आणि पिन मिळवणे सोपे जाते. 

३. वाढीव उत्पन्न/पैसे ईमेल:

 • मनी म्युल्स(Money Mules) म्हणजे, जागरूक नसलेले पीडित, सर्वसाधारणपणे नोकरी शोधणारे आणि सुलभ ऑनलाइन पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे लोक आहेत.
 • मोठमोठ्या कंपन्यांकडून नोकरी मिळवण्याचे आमिष दाखवून गरजू लोकांना आकर्षित केले जाते आणि त्यांना छोट्याशा कामासाठी भरपूर कमिशन किंवा फ्रॉम वर्क होम जॉब, अर्धवेळ काम यासाठी मोठ्या पगाराची ऑफर दिली जाते. यासंदर्भात इमेल्स व फोन कॉल्स केले जातात. 

विशेष लेख: सायबर सुरक्षा – इंटरनेट वापरताना कुठे क्लीक करताय ?

Online Banking: ऑनलाईन व्यवहारांसाठी ५ महत्वाच्या टिप्स 

१. आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका:

 • आपल्या वैयक्तिक तपशीलांची माहिती शेअर करणे टाळा. ते आपले नातेवाईक किंवा जवळचे मित्र असले तरीही आपले पासवर्ड, ओटीपी इत्यादी माहिती सांगणे धोक्याचे ठरू शकते.
 • कोणतीही बँक आपली गोपनीय माहिती फोन किंवा ईमेलद्वारे कधीही विचारणार नाही. यासंदर्भात बँक, विमा कंपन्या आपल्या ग्राहकांना वेळोवेळी मेसेजेस व इ मेल्स करत असतात. त्यामुळे बँकेकडून आलेला फोन कॉल किंवा आपल्या तपशीलाची विनंती करणारा ईमेल अशा कोणालाही आपली गोपनीय माहिती (लॉगिन आयडी) देऊ नका.
 • आपला पासवर्ड ‘स्ट्रॉंग’ व कोणालाही सहज समजेल असा ठेवू नका. (अधिक माहितीसाठी वाचा: हे ३० पासवर्ड्स चुकूनही वापरू नका)

२. बँकैची अधिकृत वेबसाईट 

 • लॉग इन करताना युआरएल मध्ये ‘https://’ पहा; याचा अर्थ वेबसाइट सुरक्षित आहे. शिवाय आयपी ऍड्रेसच्या आधी कुलुपाच्या आकाराचे चिन्ह आहे ना याची खात्री करीन घ्या. लाल किंवा तत्सम रंगाचा त्रिकोण दिसत असेल तर ताबडतोब वेबसाईट बंद करा. 
 • आपल्या लॉगिन आयडी आणि पासवर्डचा वापर फक्त बँकेच्या अधिकृत लॉगिन पृष्ठावर करा.
 • बँकेकडून येणाऱ्या ऑफर्स, फॉर्म्स , नोकरीच्या ऑफर्स अशा ई-मेल्सच्या सत्यतेबद्दल शंका वाटत असेल, तर ई-मेलमधील लिंक कॉपी करून कोणत्याही खात्रीशीर ब्राउझर मध्ये पेस्ट करा. जर फेक ई -मेल असेल, तर ही लिंक ओपन होमर नाही. 
 • लक्षात ठेवा, तुमची बँकेसंदर्भातली माहिती फक्त तुमच्याकडे सुरक्षित असते. कोणत्याही परिस्थितीत अशा संवेदनशील माहितीचे हस्तांतरण फार महागात पडू शकते.

३. सार्वजनिक वाय-फाय वापरणे टाळा

 • बँक व्यवहारांसाठी सार्वजनिक वाय-फाय वापरणे टाळा. या नेटवर्कचा सर्वात मोठा धोका म्हणजे हॅकर.
 • अगदी हॉटस्पॉट द्वाराही एखादा हॅकर तुमच्या ‘डिव्हाईस’ मधील सर्व डेटा शोधू शकतो. 

४. लॉग इन आयडी ऑटो सेव्ह करू नका

 • कोणत्याही वेब ब्राउझरला आपल्या ऑनलाइन बँकिंग वेबसाइट्ससाठी खाजगी युजरनेम आणि संकेतशब्द (Password) माहिती संग्रहित (Save) करण्याची परवानगी देऊ नका.
 • काही वेब ब्राउझर स्वयंचलितपणे लॉगिन माहितीचा गैरवापर करू शकतात म्हणून आपल्या वेबसाइटसाठी ‘ऑटोसेव्ह’ हे वैशिष्ट्य शक्यतो वापरू नका.

५. ब्ल्यूटुथ बंद ठेवा:

 • ब्लूजॅकिंग, ब्ल्यूझनर्फिंग किंवा ब्लूबगिंगबद्दल आपण कधी ऐकले आहे का? हे असे धोके आहेत जे ब्लूटुथद्वारे हॅकिंगचा वापर करू शकतात.
 • सायबर क्रिमीनल्स केवळ ब्लूटूथद्वारे फोन किंवा कॉम्प्यूटरमध्ये टॅप करतात आणि नंतर आपल्या कार्यांचे नियंत्रण करतात. या समस्येस टाळण्यासाठी, जेव्हा वापर करीत नसता तेव्हा आपले ब्लूटुथ बंद करा.  

महत्वाचा लेख: तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?

इंटरनेट बँकिंग वापरताना कळत नकळत अशा काही चुका होऊन जातात की ज्यामुळे तुमची जमापुंजी धोक्यात येते. मोठे आर्थिक नुकसान टाळायचे असेल, तर इंटरनेट बँकिंगचा काळजीपूर्वक वापर करणं फार महत्वाचं आहे.  इंटरनेट बँकिंग हे साधन जितकं सोईस्कर आहे तितकंच धोक्याचंही आहे. इंटरनेट बँकिंगबद्दलची अपुरी माहिती फार महागात पडू शकते. ‘Half knowledge is always dangerous’, हे अगदी खरं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.