तुमच्याकडे चार लाख रुपये असल्यास त्याच तुम्ही काय करणार? तुम्ही या पैशाने नवीन कार घेऊ शकता, दागदागिने विकत घेऊ शकता किंवा परदेशात प्रवास करू शकता.पण तुम्ही हे जाणून नक्की आश्चर्यचकित व्हाल की, चार लाख रुपयांमध्ये केवळ चार पाने असलेलं एक छोटं रोपटं खरेदी केल गेलं. न्यूझीलंडमध्ये दुर्मिळ पिवळी पाने असलेल्या या रोपट्याची किंमत 4 लाख रुपये आहे.
जगात खूप कमी ठिकाणी आढळणारी वनस्पती म्हणजे ‘राफिडोफोरा टेट्रास्पर्मा’ , ज्याला ‘फिलोडेन्ड्रॉन मिनिमा’ असेही म्हणतात. याची खास गोष्ट अशी आहे की, याच्या प्रत्येक पानाचा रंग पिवळ्या रंगात परिवर्तित होतो.
एका वृत्तानुसार, लोकांनी हा प्लांट खरेदी करण्यासाठी न्यूझीलंडच्या सर्वात मोठ्या व्यवसायिक साइट ‘ट्रेड मी’वर बोली लावली. अखेरीस न्यूझीलंडच्या एका विजेत्याने चार लाख रुपयांत ($ 8,150) हा प्लांट खरेदी केला.
ट्रेड मी साईटवर लिहले होते की, हिरव्या रंगाची पाने प्रकाश संस्लेशन प्रक्रिया सुलभ करतात. तिथेच फिक्कट हिरव्या किंवा पिवळ्या रंगाची पाने स्टार्च तयार करतात. पण भविष्यात हे रोपटं कसे वाढेल आणि कसे होईल याबद्दल काही माहिती नाही.
अनामिक खरेदीदाराने रेडिओ न्यूझीलंडला सांगितले की, ही वनस्पती ‘ट्रॉपिकल पॅराडाईझ’करता खरेदी केली गेली आहे. तीन लोकांचा एक गट आहे जो ‘ट्रॉपिकल पॅराडाईझ’ निर्माण करत आहे. जिथे पक्षी असतील फुलपाखरे असतील आणि मध्ये एक रेस्टॉरंट असेल. आम्हाला जगातील सर्वोत्कृष्ट वनस्पतींचा संग्रह हवा आहे. न्यूझीलंडमध्ये अशाप्रकारची जागा एक आश्चर्य असेल. कदाचित जगातही हे आश्चर्य असेल.