जगभरात कोरोनाचे संक्रमण वाढताच प्रत्येक देशाने आंतरराष्ट्रीय विमान सेवा अनिश्चित काळासाठी थांबवली. मात्र ही विमान सेवा किती दिवस तुम्ही बंद ठेवणार असा सवाल करत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अढानम गेब्रेसस यांनी प्रत्येक देशाला सीमा अंतर्गत सुरक्षा वाढवण्याचे आवाहन केले. जेणे करून अंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करता येईल.
यावेळी टेड्रोस अढानम गेब्रेसस म्हणाले की, चेहऱ्यावर मास्क घालून, अंतर ठेवून आणि खाण्याच्या पद्धतीत बदल केल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता येतो. ते म्हणाले की, जगातील ज्या देशांमध्ये हे नियम पाळले जात होते तेथे संक्रमण कमी होऊ लागले आणि रूग्णही निरोगी होऊ लागले. जिथे त्यांचे पालन केले जात नाही तेथे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.
कॅनडा, चीन, जर्मनी आणि दक्षिण कोरिया या देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. याचे गेब्रेसस यांनी कौतुक केले. ही एक भयंकर महामारी आहे. दक्षता घेतली गेली नाही तर कोरोनामुळे जगभरात 1.6 दशलक्षाहून अधिक लोक मारले जाऊ शकतात.
WHOचे आपत्कालीन कार्यक्रमाचे प्रमुख माईक रायन म्हणाले की, कोणत्याही देशाला बर्याच काळासाठी बंद ठेवनणे, हे शक्य नाही. अर्थव्यवस्था गतिमान ठेवण्यासाठी रहदारी सुरू करावी लागेल.” लोकांना काम करावे लागेल, व्यवसाय सुरू करावा लागेल. या बरोबरच आम्हाला कोरोना विषाणूचा सामना करण्याचे मार्गही राबवावे लागतील. यामुळे आपली शक्ती वाढेल आणि विषाणूचा संसर्ग कमी होईल.
स्पेनचे उदाहरण देऊन रायन म्हणाले, “कोरोना संसर्गामुळे स्पेनमध्ये परिस्थिती बिकट झाली होती. आता परिस्थिती नियंत्रणात असून परिस्थिती सुधारत आहे. कोरोना नावाचा हा आजार आपल्याला समजला आहे, म्हणून, त्याचा परिणाम आता कमी होईल. काही आठवड्यांनंतर कदाचित कोविड -19 देखील इतर आजारांप्रमाणे होईल.